प्रशांत कांबळे वर खोटे गुन्हे दाखल केले त्याची चौकशी करा :-  एस एम देशमुख

0
715

नागपुर –

मराठी पत्रकार परिषद मुंबई आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा हेडगेवार सभागृह संघ भूमि नागपुर येथे  संपन्न झाला. या वेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.  याप्रसंगी प्रास्ताविक भाषणात एस.एम. देशमुख यांनी मागणी केली कि, अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील  पत्रकार प्रशांत कांबळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत त्याची चौकशी ताबडतोब करावी. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रात पत्रकारांवर खोटे गून्हे दाखल होत आहेत. करिता या गंभीर बाबींकडे सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष द्यावे.

दरम्यान, उत्तर नागपूरचे आमदार श्री मिलिंद माने यांना भेटून राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे वतीने पत्रकार प्रशांत कांबळे अत्याचार प्रकरणाची माहिती देण्यात आली असून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत ही माहिती पोहचविण्याची व प्रशांत कांबळे यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन श्री माने यांनी दिले.
कार्यक्रमाला अमरावती वरुन दैनिक मंडल चे संपादक श्री अनिल अग्रवाल, साध्य दैनिक उदयाची बात चे संपादक श्री विजय ओड़े, पत्रकार सुरेंद्र आकोड़े, विजय खवसे कार्यक्रमात उपस्थित होते.