4 वर्षीय बहिणीवर चुलत भावाचा बलात्कार

0
950
विनोद तायडे  / वाशिम-
वाशिम जिल्ह्यातील जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किन्हीराजा येथे भावा बहिणीच्या  पवित्र नात्याला  काळिमा फासत चुलत भांडणे 4 वर्षीय बहिणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना दि 19 जून ला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली .
भावा बहिणींनीचे पवित्र नाते आहे मुलीने मुलाला राखी बांधल्यावर तो भाऊ बहिणीच्या रक्षणार्थ  सदैव्य उभा राहतो. त्या  पवित्र धाग्याला एवढे महत्व आहे. किन्हीराजा येथे भावाने बहिणीवर बलात्कार करून पवित्र नात्याला कलंकित केलेे . दि 19 जून ला सायंकाळी  5 वाजता आरोपी  राठोड वय 18 (वर्ष) याने  खाऊचे आमिष दाखवून 4 वर्षीय बहिणीला  घरात बोलावून बलात्कार केला .घृणीत घटनेबाबत पीडित बालिकेच्या आई वडिलांना माहिती होताच त्यांनी 21 जून ला  जऊळका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 354,376,(2 )ई (3)  बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हयाचा नोंद करून आरोपीला त्वरित अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली  पी एस आय आसरेवार करीत आहेत.