*औद्योगीकरणा पासून अमरावती जिल्हा मागासलेला*

0
864
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-




विदर्भातील सुप्रसिद्ध जिल्हा म्हणजे अमरावती.ऐतिहासिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,पौराणिक,राजकीय व संतसंस्कृतीचा वारसा लाभलेला हा जिल्हा परंतू औद्योगीकरणा पासून वंचित राहिला आहे.
    विदर्भ तसाही मागसलेला प्रांत आहे पण त्यामध्ये आपली विविध क्षेत्रांत ओळख बनवून प्रसिद्ध असलेला अमरावती जिल्हा हा औद्योगिक विकासापासून वंचित राहिला आहे.हा जिल्हा ऐतिहासिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,पौराणिक,राजकीय व संतसंस्कृतीचा वारसा लाभलेला आहे परंतू औद्योगिक विकासाच्या दृष्टीने आजही मागासलेला राहिला आहे.जिल्ह्यातील अचलपूर,चिखलदरा,वरूड व मोर्शी हे तालूके नैसर्गिक संपत्ती ने संपन्न आहेत तसेच व-हाड प्रांत म्हणून ऐतिहासिक ख्याती आहे.चांदूर बाजार व तीवसा या तालुक्याला संतसंस्कृतीचा वारसा लाभलेला आहे.अमरावती,धामणगाव व चांदूर रेल्वे यांना पौराणिक,शैक्षणिक व राजकीय वारसा लाभलेला आहे तसेच दर्यापूर व अंजनगाव सुध्दा आपल्या परिने सर्वश्रृत असे तालुके या जिल्ह्यात आहे.या जिल्ह्याने अनेक विद्वान देशाला दिले तसेच राज्यपाल व राष्ट्रपती सारखे उच्चस्थ पदाचे स्थान सुध्दा या जिल्ह्यातील व्यक्तींनी भुषवीले.आजही अनेक नामवंत राजकीय पुढारी या जिल्ह्यातील राज्य व देश पातळीवर कार्यरत आहेत.संत गाडगेबाबा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,गुणवंत महाराज व ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराजासारखे संत याच जिल्हात होवून गेले.सातपुड्यासारख्या निसर्गरम्य पर्वत रांगा,भरपूर नैसर्गिक संपत्ती,मुबलक पाणी,पाहिजे तेवढी जमीन,दळणवळणाची सुविधा,सर्व क्षेत्रातील ज्ञान असणारे विद्वान,भरपूर मनुष्य बळ व कुशल कारागीर उपलब्ध असतांना व तसे कारागीर निर्माण करण्यासाठी आवश्यक असणा-या शैक्षणिक सुविधा असतांना या जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पाहिजे तशी औद्योगिक प्रगती झाली नाही शिवाय राजकीय वर्चस्व असणा-यांनी करून घेतली नाही यामुळे या जिल्ह्यातील सुशिक्षीत तरूण दुसरीकडे रोजगाराच्या शोधात भटकत आहेत व दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाणात वाढ होत आहे व युवावर्गात शासन व प्रशासनाबद्दल तिव्र असंतोष धुमसत असल्याचे दिसत आहे तरी राज्यकर्ते व जनप्रतीनीधींनी या बाबत गांभीर्याने विचार करून आपल्या जिल्ह्यातील युवा शक्ती करिता हाताला काम देण्याचे दृष्टीने रोजगार निर्मिती करून औद्योगिक विकास घडवून आणावा अन्यथा हे देशहिता करीता उपयोगात येणारी युवाशक्ती देशविघातक ठरू शकते किंवा व्यसनाधीन होवून नष्ट होण्याचे मार्गावर सुध्दा जाऊ शकते असा सुर युवावर्गात एकण्यास मिळत आहे.