येणारे वर्ष सर्वच हिंदुत्वनिष्ठांच्या जामिनाचे ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

0
1264
Google search engine
Google search engine
अन्वेषणकाळात श्री. समीर गायकवाड यांना १७ जून या दिवशी जामीन मिळाला आहे. सनातन संस्था आणि सनातनचे साधक यांच्यावर जे अनन्वित अत्याचार केले गेले. ते अत्यंत चुकीचे होते, हेच त्यातून दिसून येते. देशभरातील पुरोगामी आणि काही लोकप्रतिनिधी सनातन संस्था ही आतंकवादी संस्था असल्याची आवई उठवत होते. हे खोटे असल्याचे आता सिद्ध झाले. यापूर्वी साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन झाला आहे. लवकरच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, तसेच संतश्री प.पू. आसारामबापू यांच्यासह सर्वच हिंदुत्वनिष्ठांना जामीन मिळेल. हे वर्षच हिंदुत्वनिष्ठांच्या विजयाचे असून हे वर्ष हिंदुत्वनिष्ठांच्या जामीनाचे असेल, असे विचार हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी हिंदु अधिवेशनात आयोजित केलेल्या विशेष सत्रात काढले. अन्वेषण यंत्रणांनी निष्पक्ष चौकशी करणे अपेक्षित आहे. सनातन संस्था आणि दैनिक सनातन प्रभात यांनी डॉ. दाभोलकर यांच्या ट्रस्टचे खरे स्वरूप उघडकीस आणले. डॉ. दाभोलकर यांच्या ट्रस्टमध्ये लक्षावधी रुपयांचा घोटाळा असून त्यांच्या कुटुंबियांची चौकशी व्हायला हवी ! ज्याप्रकारे मडगाव स्फोट प्रकरणात सनातनच्या सहा साधकांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. कॉ. पानसरे प्रकरणातही समीर यांना अटक करण्यात आली. पोलीस पुष्कळ पुरावे असल्याचे सांगत होते; मात्र कोणतेच पुरावे पोलीस न्यायालयात सादर करू शकले नाहीत.  साम्यवादी आणि पुरोगामी लोकांकडे भरपूर पैसे असून त्यांनी एका निरपराध शेतकरी मुलाला षड्यंत्र करून कॉ. पानसरे हत्या प्रकरणात अटक करण्यास भाग पाडले. या प्रकरणात विशेष शासकीय अधिवक्त्यांवर शासनाने लक्षावधी रुपये व्यय केले. त्यामुळे आता स्वत:ला पुरोगामी आणि साम्यवादी म्हणवणाऱ्यां लोकांची चौकशी व्हायला हवी !  दोन हत्यांच्या माध्यमातून पुरोगामी आणि साम्यवादी यांनी सनातन संस्थेची खूप अपकिर्ती करण्याचा प्रयत्न केला; मात्र सनातन संस्थेचे कार्य अल्प न होता ते वाढतच गेले आणि यापुढे वाढतच राहिल, असा विश्वास मला वाटतो.