जळगावातील हिंदुत्वनिष्ठांची पोलीस अधिक्षकांना निवेदन देऊन ‘दैनिक लोकमत’वर कारवाई करण्याची मागणी !

0
638
Google search engine
Google search engine
जळगाव – 
Sorce – लोकमत वृत्तसंकेतस्थळ 
दैनिक लोकमतने १६ जूनच्या अंकात ‘गोहत्येवरुन देश वेठीला धरणार काय ? या संपादकीय लेखाद्वारे हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवत गोमांस भक्षण केल्याने चांगले प्रोटीन मिळतात, असे सांगून सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींचा अवमान करत म्हटले आहे की, श्रद्धेच्या आंधळ्या पातळीवर जाणारी विचारशून्य माणसे जेव्हा अधिकार पदावर येतात तेव्हा त्यांचे म्हणणे देशाने आणि समाजाने शिरोधार्य मानायचे काय ? असा प्रश्नच उपस्थित करून थेट भारतीय न्यायव्यवस्थेवरच बोट ठेवण्यात आले आहे. जळगावातील समस्त धर्माभिमानी हिंदूंनी या संपादकीय वृत्ताची नोंद घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. दत्ता कराळे यांना घटनेची जाणीव करुन देऊन भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ अ नुसार लोकमत संपादक मंडळाविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी केली असता पोलीस अधीक्षक श्री. कराळे यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करून संबधितांवर कायदेशीर दृष्ट्या काय कारवाई करता येईल, याची शहानिशा करुन कळवतो.
या वेळी हिंदु धर्माभिमानी सर्वश्री रवींद्र सपकाळे. मयूर भदाणे, आशिष गांगवे, रवींद्र हेंबाडे, आदित्य धर्माधिकारी, प्रणव नागणे, यांच्यासह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.
साभार – दैनिक सनातन प्रभात वृत्तसंकेतस्थळ