एमएमआरडीएच्या प्रकल्पांना एलआयसीने वित्तसहाय्य करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
640
Google search engine
Google search engine
मुंबई-: 
भारतीय जीवन बिमा निगमचे (एलआयसी) अध्यक्ष व्ही. के. शर्मा यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मुंबई शहर आणि मुंबई महानगर क्षेत्रातील मेट्रो, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी एलआयसीने वित्तसहाय्य करावे, असे आवाहन केले. त्यास श्री.शर्मा यांनी प्रतिसाद देत वित्तपुरवठ्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त युपीएस मदान, अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे आदी उपस्थित होते.