दहावीच्या परीक्षेत चांदूर रेल्वे तालुक्याचा निकाल ८४.०८ टक्के – चांदूर रेल्वे न.प.आझाद उर्दु हायस्कूलचा चा निकाल १००

0
717

१०० टक्के निकाल लावत जिंगल बेल स्कूल तालुक्यातून सलग चवथ्यांदा अव्वल

सुलभाताई जगताप विद्यालय, निमगव्हाण व चांदूर रेल्वे न.प.आझाद उर्दु हायस्कूल  चा निकाल १००
टक्के

चांदूर रेल्वे / शहेजाद खान – 

म.रा.माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे तर्फे  घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये चांदूर
रेल्वे तालुक्याचा निकाल ८४.०९ टक्के लागला असुन मागील
वर्षीच्या तुलनेत निकालात ३.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चांदूर रेल्वे येथील जिंगल बेल इंग्लिश स्कूलने
सलग चार वर्षापासून १०० टक्के निकाल लावत नवा उच्यांक गाठला आहे. सुलभाताई जगताप माध्यमिक
विद्यालय, निमगव्हाण, न.प.मौलाना आझाद उर्दु शाळा, चांदूर रेल्वे या शाळेचा १०० टक्के निकाल लागला
असुन या तिन्ही शाळेनी निकालात तालुक्यातून अव्वल स्थान पटकविले आहे. तर ग्रामीण भागातीलआमला
विश्वेश्वर येथील श्रीकृष्ण हायस्कूलचा  निकाल ९५.२७ टक्के लागला असून तालुक्यात व्दितीय स्थान
पटकविले. तर ९४.४४ टक्के निकाल लावत शासकीय अनुसूचित जाती निवासी विद्यालय, तुळजापुर
ने तिसऱ्या  स्थानी झेप घेतली आहे.
www.vidarbha24news.com

विद्या मंदिर विद्यालय, सातेफळ चा निकाल ९१.६६ टक्के, माध्यमिक विद्यालय, राजुरा चा निकाल ९१.५२
टक्के, संत मनिराम महाराज, कवठा कडू चा निकाल ९०.४७ टक्के, चांदूर कन्या शाळा, चांदूर रेल्वेचा
निकाल ८५.७१टक्के, जि.प.हायस्कूल , चांदूर रेल्वेचा निकाल ८३.२५ टक्के, मन्नालाल गुप्ता विद्यालय,
चांदूर रेल्वेचा निकाल ८१.७३ टक्के, बेंडोजी बाबा विद्यालय, घुईखेडचा निकाल ७७.६३ टक्के, श्रीराम
विद्यालय,बोरीचा निकाल ८०.५५ टक्के, सखाराम खरबडे विद्यालय, कारला यांचा निकाल ७९.१६ टक्के,
अतुल जगताप विद्यालय, चांदूर रेल्वेचा निकाल ८४.८४ टक्के, माध्यमिक विद्यालय, पळसखेड चा निकाल
७० टक्के, वं.रा. तुकडोजी महाराज विद्यालय, मालखेड रेल्वेचा निकाल ७४.५०, मनिराम महाराज विद्यालय,
बग्गी चा निकाल ७६.९२ टक्के, मुकनिराम गांधी विद्यालय, धनोडी चा निकाल ७१.४२ टक्के, संत गाडगेबाबा
विद्यालय,मांजरखेड कसबा चा निकाल ७०.२१, इंदिरा गांधी विद्यालय, आमला विश्वेश्वरचा निकाल ८१.८१
टक्के, शारदा कन्या शाळा, मालखेड रेल्वेचा निकाल ७९.०९टक्के, शासकीय आश्रम शाळा, चिरोडी चा
निकाल ८९.८३ टक्के, समता विद्यालय, जळका जगताप चा निकाल ८५.२१ टक्के टक्के लागला आहे.