​माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

0
512
Google search engine
Google search engine

 नवी दिल्ली :-  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.
    महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारी विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी  श्री. शिंदे यांना दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने यावेळी श्री. शिंदे यांना भेट स्वरूपात देण्यात आली. ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. शिंदे यांनी माहिती जाणून घेतली. श्री. शिंदे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.