*पुरात शिक्षक गेले वाहून*

0
510

वाशिम / रुपेश बाजड-

 

 

रिसोड तालुक्यातील पवारवाडी येथील नाल्याला १९ जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास आलेल्या पुरात शिक्षक वाहून गेल्याची घटना २० जुलै रोजी उघडकीस आली. नामदेव साहेबराव धोत्रे (४५) असे शिक्षकाचे नाव असून, अद्याप त्यांचा शोध लागला नाही.
१९ जुलै रोजी सायंकाळनंतर रिसोड तालुक्यात धो धो पाऊस बरसल्याने पवारवाडी नाल्याला पूर आला. या दरम्यान हिंगोली येथून रिसोडकडे येताना नामदेव साहेबराव धोत्रे यांनी या पुरातून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले तर त्यांच्यासोबत असलेले अन्य एक जण सुखरूप बाहेर आले. नामदेव धोत्रे हे मराठवाड्यातील सेनगाव तालुक्यातील केलसुला येथील रहिवासी असून, सध्या ते रिसोड येथील अनंत कॉलनी येथे राहतात. गावकरी व तालुका प्रशासनाच्यावतीने त्यांचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे.