शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी)चे 22 जुलै रोजी आयोजन

0
597
Google search engine
Google search engine

• पेपर 1 साठी 4732, तर पेपर 2 करीता 3300 परीक्षार्थी
• 21 परीक्षा केद्रांचे नियोजन

 

बुलडाणा  – जिल्ह्यात शनिवार 22 जुलै 2017 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा – 2017 आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेचे दोन पेपर होणार आहेत. पहिला पेपर सकाळी 10.30 ते 1 या वेळेत होणार आहे. तर दुसरा पेपर दुपारी 2 ते 4.30 या कालावधीत होणार आहे. या परीक्षेत पेपर 1 करीता 4732 व पेपर 2 साठी 3300 विद्यार्थी बसणार आहे. तसेच परीक्षेसाठी बुलडाणा, भादोला व कोलवड येथील एकूण 21 परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
यामध्ये पेपर 1 साठी विद्याविकास विद्यालय कोलवड,महात्मा फुले प्राथमिक शाळा मुठ्ठे ले आऊट बुलडाणा, पंकज पद्धड अभियांत्रिकी महाविद्यालय बुलडाणा, शाहू अध्यापक विद्यालय सुंदरखेड, जिजामाता महाविद्यालय बुलडाणा, गांधी प्राथमिक शाळा एचडीएफसी चौकाजवळ बुलडाणा, गोडे डिएड महाविद्यालय जुना अजिसूपर रोड बुलडाणा महात्मा फुले विद्यालय नांद्राकोळी परीक्षा केंद्र आहेत. तसेच पेपर 1 व पेपर 2 करीता शिवाजी विद्यालय सुवर्ण नगर मंदीराजवळ बुलडाणा, राजीव गांधी सैनिकी शाळा अजिंठा रोड बुलडाणा, सहकार विद्या मंदीर चिखली रोड बुलडाणा, उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इक्बाल चौक बुलडाणा, प्रगती बीएड महाविद्यालय येळगांव बुलडाणा, मुलांची जिल्हा परिषद हायस्कूल बुलडाणा, सेंट जोसेफ हायस्कूल खामगांव रोड बुलडाणा, श्री शिवाजी हायस्कूल भादोला, शारदा ज्ञानपीठ बुलडाणा, भारत विद्यालय चिखली रोड येथील ए केंद्र व बी केंद्र, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनीयरींग व कॉलेज पॉलीटेक्नीक पाळणा घराजवळ बुलडाणा परीक्षा केंद्र असणार आहेत.
परीक्षा केंद्रांची जिल्ह्यात पाच झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून पाच झोनल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेस उपस्थित रहावे, असे आवाहन सदस्य सचिव टीईटी परीक्षा आयोजन समिती तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले आहे.