​डिजिटल लॉकर्स प्रणाली संदर्भात विद्यापीठाचा करार-विद्याथ्र्यांना मिळणार सहज शैक्षणिक दस्तऐवज

0
447
Google search engine
Google search engine

अमरावती
    विद्याथ्र्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षित ठेवता यावी आणि ती त्यांना कुठल्याही ठिकाणाहून आणि केव्हाही उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने सी.डी.एस.एल. व्हेन्चर्स लिमीटेड या संस्थेशी विद्यापीठाने करार केला आहे.  या करारावर आज विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. जे.डी. वडते यांचे उपस्थितीत स्वाक्षरी केली.

    विद्याथ्र्यांना डिजिटल लॉकर्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठांना सूचना केल्या आहेत.  आयोगाच्या धोरणानुसार पेपरलेस कारभार स्वीकारणे काळाची गरज असून त्यादृष्टीने विद्यापीठांना डिजिटायझेशनकडे वाटचाल करण्याचे निर्देश दिले आहे.  विद्यापीठाने आता करार केल्यामुळे विद्याथ्र्यांची सर्व शैक्षणिक कागदपत्रे डिजिटल डिपॉझिटरीवर उपलब्ध असणार आहे.  या कागदपत्रांमध्ये गुणपत्रिका, पदवी आणि इतर अनुषंगिक प्रमाणपत्र उपलब्ध होणार असून ते विद्याथ्र्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी त्याबाबतची प्रणाली कराराद्वारे निश्चित केली आहे.  2019 पर्यंत या प्रणालीसाठी विद्याथ्र्यांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

    कुलगुरु डॉ. श्री मुरलीधर चांदेकर यांनी विद्यापीठाला आधुनिक व डिझीटाईज्ड  करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत.  त्यापैकी ह्रा योजनेसह अनेक योजना पूर्णत्वास येत आहेत.  विद्यापीठाच्या या निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांकडून कौतुक होत आहे.