​गणेश खंडाळकर यांची भाजयुमो शहर सरचिटणीसपदी निवड

0
487
Google search engine
Google search engine

महेंद्र महाजन / वाशिम

– येथील भाजपाचे सक्रीय युवा कार्यकर्ते गणेश खंडाळकर यांची भाजयुमोच्या वाशीम शहर सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. आमदार लखन मलीक यांच्या जनसंपर्क कार्यालयात 20 जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमात आमदार लखन मलीक यांच्या हस्ते खंडाळकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
    यावेळी नियुक्तीपत्र देतांना आमदार लखन मलिक, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, जिल्हा प्रभारी अक्षय पाटील लहाने, भाजयुमो प्रदेश सदस्य राहुल तुपसांडे, जिल्हा सरचिटणीस सुरज चौधरी, विजय काळे, भाजपा तालुका अध्यक्ष बंडु पाटील महाले, भाजप शहर अध्यक्ष धनंजय हेंन्द्रे, भाजयुमो शहर अध्यक्ष पवन जोगदंड यांच्यासह भाजपा व भाजयुमोचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. खंडाळकर यांनी आपल्या निवडीचे श्रेय भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलीक, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, भाजयुमो प्रदेश सदस्य राहुल तुपसांडे, भाजप शहर अध्यक्ष धनंजय हेंन्द्रे, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष सुनिल पाटील, जिल्हा सरचिटणीस सुरज चौधरी यांना दिले आहे. पक्षश्रेष्ठींनी आपल्या कार्याची घेतलेली दखल आणि आणि आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करत शहरात भाजयुमोचे संगठन अधिक मजबुत करुन भाजपाचे विचार तळागाळापर्यत पोहचविण्याचा मानस यावेळी खंडाळकर यांनी व्यक्त केला.