चांदुर रेल्वे ग्रामिण रूग्णालयातील बायोवेस्ट कचराकुंडीत – अाराेग्य वाऱ्यावर

0
473
Google search engine
Google search engine
कचरा कुंडीत असलेले सिरीन, सलाईन बॉटला
बायोवेस्ट टैंकची जागा
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )
शहरातील ग्रामिण रूग्णालयात बायोवेस्ट टैंक असतांनासुध्दा सदर बायोवेस्ट थेट कचराकुंडीत टाकला जात असल्याने अनेक समस्या उद्भवत अाहेत. यांत औषधी गोळ्या, सिरीन, सलाईन बॉटल्यांचा समावेश आहे. उघड्यावर पडलेल्या या अाैषधांमुळे माेठ्या प्रमाणावर हानी पाेहाेचण्याची शक्यता नाकारता येणार नसून, याबाबत रूग्णालयातील प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याने अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे.
ग्रामिण रूग्णालयातील बायोवेस्ट करीता एक विशेष टैंक बनविण्यात आली आहे. असे असतानाही रूग्णालयात कडेलाच एका कचराकुंडीत औषधे टाकण्यात येत आहे. रूग्णालयातील या उघड्यावरील औषधांमुळे रूग्णालयात येणाऱ्या  लहान मुलांसह इतरांच्याही अाराेग्याला धाेका निर्माण हाेऊ शकताे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी अनेकांनी केली अाहे. अाैषधांत रंगीबेरंगी पॅकेटसही असल्याने त्याकडे चटकन लक्ष वेधते. ही रासायनिक अन् अत्यंत धाेकादायक औषधे जर लहान मुलांच्या हातात पडली तर माेठी दुर्घटनाही घडू शकते. त्याचबराेबर जनावरांनीही त्याचे सेवन केल्यास अतिशय गंभीर परिणाम हाेऊ शकतात.  नियमांना पायदळी तुडवून मेहनत वाचवण्यासाठी हलगर्जीपणाने वाट्टेल तेथे औषधे फेकणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन संबंधितांची तपासणी करणे गरजेचे अाहे. जेणेकरून पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत असे मत एका रूग्णाने व्यक्त केले. बायोवेस्ट करीत मोठी टैंक असुन सुध्दा बायोवेस्ट कचराकुंडीत फेकत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे..

” लोकांसांगे ब्रम्हज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण”

वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी रूग्णालयातील  बायोवेस्ट तपासण्याकरीता एक समीती नेमण्यात आली होती. यामध्ये जवळपास एक महिन्यापुर्वी या समितीने शहरातील प्रत्येक खाजगी रूग्णालयात धाड टाकुन बायोवेस्टची पाहणी केली होती. खाजगी रूग्णालयात धाड टाकणारे हे सरकारी कर्मचारी स्वत:च्याच ग्रामिण रूग्णालयात मात्र या बायोवेस्टच्या विल्हेवाटबाबत अनभिज्ञ असल्यामुळे  ” लोकां सांगे ब्रम्हज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी म्हण म्हणण्याची वेळ आली आहे..