सरकार हिंदूंच्या बाजूने स्पष्टपणे केव्हा बोलणार ?

0
542

 

 

‘उगाचच काहींना वाटते, आम्ही मोदीविरोधी आहोत. अजिबात नाही. त्यांनी पंतप्रधान व्हावे, म्हणून मी ४० सभा घेतल्या आहेत; पण वेळ संपत चालली आहे. तेव्हा मनात आलेले विचार मांडतो.

मोदी २४ घंटे काम करतात, परदेशात जाऊन संबंध सुधारत आहेत. ‘बिझनेस’ देशात घेऊन येत आहेत. ‘योग दिन’ साजरा करतात. ‘सेक्युलर’ देश घोषित करतात. सतत राज्य आणि नगरपालिका निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांचे नातेवाइक पदांवर आणत नाहीत. भ्रष्टाचार करत नाहीत.

हे सगळे बरोबर आहे. तरीही याला दुसरी बाजू आहे. देशाचे मुख्य प्रश्‍न वेगळेच आहेत.

  • त्यातला पहिला आणि महत्त्वाचा – भरमसाठ लोकसंख्या ! ती समान नागरी कायदा केल्याशिवाय सुटणार नाही.
  • नद्या जोडणी प्रकल्प – त्याशिवाय दुष्काळ संपणार नाही.
  • दलाली पद्धत संपुष्टात आणणे – त्याशिवाय शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत.
  • पाकिस्तानशी शत्रू म्हणून सर्व पातळ्यांवरील संबंध संपवणे ! त्याशिवाय आतंकवादी कारवायांवर नियंत्रण येणार नाही.
  • जगभरात फिरून व्यापार वाढवून काय उपयोग ?
  • ‘बुलेट ट्रेन’चा काय उपयोग ?
  • ‘शाईन इंडिया’चा काय उपयोग ?
  • ‘स्मार्ट सिटीज’चा काय उपयोग ?

चांगल्या रन्स काढून मॅच जिंकून देण्याची अपेक्षा केवळ सचिन तेंडुलकरकडूनच करणार ना ? कि हरभजन सिंहकडून ? वेळ संपत चालली आहे. वर्ष २०१७ चे केवळ अर्धे आणि २०१८ चे पूर्ण वर्ष. नंतर निवडणूक ! प्रत्येक वेळी २८२ ‘सीट्स’च येतील याची गॅरंटी काय ? मग ‘अलायंन्स’ समान कार्यक्रम. ८० टक्के हिंदूंच्या बाजूने स्पष्टपणे बोलणार कि नाही ? का सतत ‘सो-कॉल्ड सेक्युलॅरिझम’चे (तथाकथित धर्मनिरपेक्षतावादाचे) नि निधर्मीपणाचे ढोल वाजवणार ?’

 – श्री. शरद पोंक्षे, प्रसिद्ध अभिनेता आणि हिंदुत्वनिष्ठ