वाशिम जिल्हा पत्रकार संघ घोषित

0
1175
Google search engine
Google search engine
वाशिम / रिसोड /महेंद्र महाजन जैन –



महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची स्थापना पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली येथे झाली असून आजघडीला संघटनेचे कार्य देशव्यापी आहे. कोणत्याही पत्रकारावर झालेला अन्याय खपवुन घेतला जाणार नसून अन्यायगस्त पत्रकारांना न्याय मिळवून देणे हे संघटनेचे प्रथम कार्य असल्याचे प्रतिपादन संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची जिल्हास्तरीय बैठक रविवार, 11 जून रोजी स्थानिक हॉटेल पवन येथे उत्साहात पार पडली. बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार मंगलदादा इंगोले हे होते. तर अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितीमध्ये शहर जिल्हाध्यक्ष विनोद तायडे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, पत्रकार मनोज जयस्वाल आदींची उपस्थिती होती. प्रारंभी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांचा हार, फुले व शाली ऐवजी वृक्षाचे रोपटे देवुून स्वागत व सत्कार करण्यात आला. व सदर वृक्षाचे रोपटे आपल्या घरीदारी लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात मंगलदादा इंगोले यांनी पत्रकारीतेची व्याख्या स्पष्ट करतांना पत्रकारीतेचे पाच प्रकार असल्याचे सांगीतले. त्यामध्ये प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीया, ट्रेडीशनल मिडीया आणि ओरल मिडीया हे आहेत. जिल्हयात अनेक प्रकारच्या पत्रकार संघटना आहेत. मात्र पत्रकार संघटनांंनी पत्रकारीतेपुरतेच आपल्याला मर्यादीत न ठेवता विधायक कार्यही केले पाहीजे. संघटनेत एकमेकांविषयी अहंभाव न ठेवता एकदिलाने, एकमताने कार्य केल्यास अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य केले पाहीजे. आपल्या प्रास्ताविकातून विभागीय अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची स्थापना, कार्य व उद्दीष्टे याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली येथे राज्य संघटक संजय भोकरे यांनी संघटनेची स्थापना केली. त्यावेळी ही संघटना नगण्य होती. मात्र आज एका वर्षात संघटनेची राज्यात दोन ते अडीच हजार सदस्य नोंदणी झाली आहे. संघटना केवळ पत्रकारापुरतीच मर्यादीत नाही तर विधायक कार्यही संघटनेच्या हातून घडले आहेत. संघटनेचे मुंबई येथे स्वत:चे कार्यालय आहे. कोणत्याही पत्रकारावर अन्याय झाला तर संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी धावून जातात. अन्यायग्रस्त पत्रकारांना न्याय देण्याचे प्रथम उद्दीष्ट संघटनेचे असून कोणत्याही पत्रकारांवर अन्याय झालेला खपवून घेतला जाणार नसल्याचे प्रतिपादन देशमुख यांनी केले. बैठकीत जिल्हाभरातून आलेल्या विविध पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष विनोद तायडे म्हणाले की, पत्रकार संघटना खुप आहेत. मात्र ज्या संघटनेत पत्रकारावरील अन्यायाला वाचा फोडली जाते तीच खरी संघटना आहे. माझ्या पत्रकारीतेची सुरुवात वयाच्या 18 वर्षापासून केली. याकाळात मी पत्रकारीतेच्या जगात खुप पाहीलं, खुप अनुभवलं आहे. आपल्याला प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम करायचे आहे. पत्रकार लहान असो किंवा मोठा. पत्रकारांनी स्वत:ला कमी समजायचे कारण नाही. कारण जे पेराल तेच उगवेल. पत्रकारांमध्ये बारुद भरायचे काम संघटना करणार आहे. काळ व वेळ कोणासाठीही थांबलेला नाही. संघटना ही एका कुटुंबासारखी असते. कुटुंबात कोणीही मोठा किंवा लहान नसतो. सर्वाना आपआपले काम करावेच लागते. आज या संघटनेत जिवाभावाची माणसे जोडली गेली आहेत. सर्वाच्या विश्‍वासामुळे या रोपट्याचे वटवृक्षांत रुपांतर नक्कीच होईल. पत्रकारांवर अन्याय झाला तर त्यांच्या पाठीशी संघटना उभी राहील. बैठकीचे संचालन पंकज गाडेकर यांनी केले. यावेळी जिल्ह्याची कार्यकारणी घोषित करण्यात आली. त्यामध्ये जिल्हयाचे मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार मंगलदादा इंगोले, जिल्हासचिव, प्रा. कृष्णकुमार लाहोटी, जिल्हा उपाध्यक्ष मनोज जयस्वाल ,फुलचंद भगत, जिल्हा कोषाध्यक्ष काशीनाथ कोकाटे, जिल्हा संघटक महादेव हरणे,सह संघटक सौरभ गायकवाड सहसचिव इम्रान खान, जिल्हा सहसचिव  प्रभाकर नाईकवाडे , प्रसिद्धी प्रमुख संदीप पिंपळकर, वाशिम शहर अध्यक्ष पंकज गाडेकर,वाशीम तालुका  अध्यक्ष मनिष डांगे,मालेगाव तालुका अध्यक्ष तुषार मांडे,कारंजा तालुका अध्यक्ष  सुनील फुलारी मानोरा तालुका अध्यक्ष संतोष कांबळे, आदींची निवड करण्यात आली. बैठकीला विशाल राऊत, प्रा. कृष्णकुमार लाहोटी, मनोज जयस्वाल, पांडूरंग अंभोरे, गजानन देशमुख, अशोक इंगळे, दिलीप शिंदे, प्रभाकर नाईकवाडे, शशिकांत जाधव, , रामकृष्ण डुबे, संदीप पिंपळकर, काशीनाथ कोकाटे, रवि डुबे, प्रमोद काळे, परमेश्‍वर जमधाडे, मनिष डांगे, महादेव हरणे, फुलचंद भगत, सुनिल फुलारी, इमरान खान, तुषार मांडे, सुभाष देवहंस,रंजनिकांत वानखडे,बाबाराव कोडापे,विठ्ठल राऊत,पंकज गाडेकर,शशिकांत जाधव, आदींसह जिल्हा व ग्रामीण भागातून अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.आभार फुलचंद भगत यांनी मानले