हिंदु राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून निर्धार करणार ! – पू. नंदकुमार जाधव

0
1259
Google search engine
Google search engine

गोव्यात ‘सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’च्या निमित्ताने जळगाव आणि सोलापूर येथे पत्रकार परिषद

जळगाव येथील पत्रकार परिषदेत डावीकडून अधिवक्ता श्री. निरंजन चौधरी, अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी, पू. नंदकुमार जाधव, श्री. विजय पाटील आणि कु. रागेश्री देशपांडे
जळगाव – हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेत असला, तरी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हिंदूंच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्याबंदी, राममंदिराची उभारणी आदी विषयांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. जवानांवरील दगडफेक आणि त्यांच्या हत्या आजही रोखता आलेल्या नाहीत किंवा जवानांवरील दगडफेक हा राजद्रोह ठरवला जात नाही. त्यामुळे हिंदु संघटनांनी आता पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी १४ जून ते १७ जून या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे होणार्‍या ‘सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या’च्या माध्यमातून निर्धार करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन सनातनचे संत पू. नंदकुमार जाधव यांनी ९ जून या दिवशी आचार्य कॉम्पेक्स येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
या पत्रकार परिषदेस हिंदु महासभेचे प्रदेश कार्यवाह अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी, अधिवक्ता श्री. निरंजन चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील आणि कु. रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या. गोव्यात होणार्‍या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी जळगाव जिल्ह्यातून २५ अधिवक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते, तसेच गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.
हिंदु महासभेचे प्रदेश कार्यवाह अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी या वेळी म्हणाले की, सध्या एकेका विषयात मर्यादित स्वरूपाचे कार्य हिंदुत्वनिष्ठ करत आहेत; मात्र एवढे कार्य पुरेसे नसून समाजनिर्मितीला पूरक असे कार्य अपेक्षित आहे. त्यादृष्टीने हिंदुत्वनिष्ठांना योग्य दिशा देण्याचे दायित्व अधिवक्त्यांचे असणार आहे.
अधिवक्ता श्री. निरंजन चौधरी या वेळी म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने कार्य करण्याची शक्ती अधिवेशनात सहभागी होणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळतेच, हे मी स्वत: अनुभवले आहे.’’