*अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परसापूर शाखेत आर्थिक साक्षरता सप्ताह उत्साहात साजरा*

0
1275
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-



 देशात सर्वत्र कँशलेस व्यवहाराला प्रारंभ झालेला आहे या मुळे काही शहरी व मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात बँक ग्राहकामध्ये भयजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे बदलत्या आर्थिक व्यवहाचे ज्ञान होणे आवश्यक आहे त्याअनुशंगाने नजीकच्या परसापूर येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत  आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा करण्यात आला.
 याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष डाँ.प्रभाकर टेहरे अध्यक्ष,सेवा सहकारी संस्था परसापूर,प्रमुख अतिथी पांडेमामा जेष्ठ नागरिक,पुरुषोत्तमजी घोरमाडे व टिकारसाहेब प्रामुख्याने उपस्थीत होते.कार्यक्रमाचे संचलन विनोद भुसाटे यांनी कँशलेस व्यवहाराची माहिती व महत्व सांगितले तसेच बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात डाँ.प्रभाकर टेहरे यांनी आपल्या अनुभवातून ए.टी.एम.कार्डचे महत्व विशद केले व जास्तीतजास्त ए.टी.एम. व कँशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले.कँशलेस व्यवहार आपल्या आर्थिक सुरक्षिततेकरीता असल्याचे पटवून दिले.कँशलेस व्यवहाराने भ्रष्टाचाराला आळा घालता येईल व आपल्या व्यवहारात पारदर्शकता येवुन आर्थिक सुरक्षिततेची खात्री आपल्याला मीळेल सोबतच देशाच्या विकासात आपले योगदान लाभेल असे त्यांनी प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनिल धनाडे यांनी केले कार्यक्रमाला बँकेचे ग्राहक व परिसरातील महिला पुरुष नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते त्यांनी सर्व माहिती एकुण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परसापूर शाखेच्या वतीने भारतीय रिझर्व बँक व नाबार्ड पुरस्कृत आर्थिक साक्षरता समुपदेशन सप्ताह अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.