*आदिवासींच्या घरोघरी पोहचल्या केंद्र राज्य सरकारच्या योजना – आ.डॉ. अनिल बोंडे*

0
1123
Google search engine
Google search engine
*पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेला उत्फूर्त प्रतिसाद*




वरुड :-
पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजना घराघरात पोहचविण्याचे कार्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. भाजपच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांपासून कुठला हि ग्रामस्थ वंचित राहू नये, याकरिता हि कार्य विस्तार योजना अतिमहत्वाची आहे. पुसला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील कार्ली, जामगाव, पिपलागड या आदिवासी गावात वरुड – मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन भाजप सरकारच्या फलश्रुतीबाबत तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनाबद्दल आदिवासी ग्रामस्थांना अधिक माहिती पटवून दिली.*
*यावेळी कार्ली गावचे सरपंच भारत पाटेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र बोडखे, इंद्रभूषण सोंडे, स्वप्नील मांडले, नितीन उर्फ चंदूभाऊ ढोरे, समीर ठाकरे, शैलेश अकर्ते, मारोतराव पाटील, कमलेश राठोड, बन्नूबाई गजाम यांच्यासह आदि भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंडित दीनदयाल उपाध्याय कार्य विस्तार योजनेला तालुक्यात उत्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने गोरगरिबांच्या समस्या हि निकाली काढण्याचे काम आ.डॉ.अनिल बोंडे यांनी कार्य विस्तार योजनेच्या माध्यमातून सुरु केले आहे.*