​व्हिस्की ची वाहतूक करणारा पोलिसांच्या जाळ्यात – 42000 मुद्देमाल जप्त

0
1202
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार-

ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची घातलाडकी फाट्यावर वर दुपारच्या सुमारास  नाकाबंदी केली असता त्यांना प्रल्हाद सोळंके वय 25 वर्ष रा कॉटन मार्केट अमरावती हा दारूची वाहतूक करताना आदळला .पोलिसांनी त्यांला ताब्यात घेतले असता त्याच्या कडून व्हिस्की आणि मॅक्डोल 60 नग  किंमत अंदाजे 12000आणि मोटार सायकल क्रमांक MH 27 AV 5126 किंमत 30000 असा एकूण 42000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सादर कार्यवाही उपनिरिषक सचिन वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉस्टेबल रवींद्र शिंपी, नाईक पोलीस कॉस्टेबल सचिन बुजाडे  यांनी केली .

पोलिसांच्या या कार्यवाही मुळे मध्य प्रदेश मधून दारूची वाहतूक हि महाराष्ट्र मध्ये मोठया प्रमाणात होत आहे.शिरजगाव कसबा चे ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी पण मध्य प्रदेश मधून येणाऱ्या इंग्लिश दारू अवैध वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लावले आहे.त्याच प्रमाणे ब्रा थडी येथील ठानेदर यांनी सुद्धा या प्रकरणी कंबर कसली असल्याचे दिसत आहे.मात्र राज्य सरकार ने मध्य प्रदेश मधील सरकार या संबंधी माहिती द्यावी अशी मागणी आता नागरिक कडून होत आहे.