मुंबई येथे आंचळ ग्रामपंचायतीचा सत्कार

0
708
Google search engine
Google search engine
महेंद्र महाजन जैन – रिसोड  (वाशिम) /-


संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात जिल्हा स्तरावर प्रथम पारितोषिक पटकाविणार्‍या रिसोड तालुक्यातील अांचळ या ग्राम पंचायतीला पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मुंबई येथे गौरविण्यात आले. यावेळी सरपंच हरिष जुनघरे आणि ग्रामसेवक भुतेकर यांचा स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, ऊप सचिव रुचेश जयवंशी, वर्ल्ड बॅंकेचे एन. राघवा, वासोचे संचालक सतिष उमरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात प्रथम आलेल्या 31 ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला.
याच कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्रात हागणदारीमुक्त झालेल्या 11 जिल्ह्यांंचा गौरव बीग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच दरवाजा बंद या माध्यम अभियानाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. महाराष्र्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह या विभागाचे केंद्रिय मंत्री व राज्यमंत्री यांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाला सर्व जिल्हा परीषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि या क्षेत्रात काम करणारे स्वच्छागृही यांची उपस्थिती होती. अंचळ ग्रामपंचायतीच्या यशाबद्दल आमदार अमित झनक, जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, ऊपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मूख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
महेंद्र महाजन जैन / रिसोड
वाशिम 
9960292121