वृक्षारोपन करून पर्यावरण दिन साजरा वनविभागाचे आयोजन

0
1268
Google search engine
Google search engine


चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )



जगातील जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे. याच अनुशंगाने ५ जुन रोजी शहरातील वनविभागातर्फे वनविभाग कार्यालय परीसरात वृक्षलागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
        स्थानिक वनविभाग कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला वनपरीक्षेत्र अधिकारी अनंतराव गावंडे, अ.भा.ग्रा. पत्रकार संघटेनेचे तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, बाजार समिती संचालक हरिभाऊ गवई, पंकज जयस्वाल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वनविभाग कार्यालय परिसरामध्ये कडुलिंब, बदाम यासारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली. ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धारही करण्यात आला.
   सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची झपाट्याने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे. औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळे पसरलेले असले तरी रस्त्यालगत वृक्षांचा वाणवा आहे. तर दुसरीकडे परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे.
सध्याच्या काळातील ग्लोबल वॉर्मिंगचे संकट लक्षात घेता प्रत्येकाने नियमितपणे वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन केले पाहिजे असे मत पत्रकार गुड्डु उर्फ प्रविण शर्मा यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परीश्रम घेतले.