इंदिरा कँटीनसाठी ३०० वर्षे जुन्या मंदिराचा भाग उद्ध्वस्त-कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष चालूच !

0
569
Google search engine
Google search engine

सरकारी योजनेसाठी एखादे चर्च किंवा मशीद यांचा भाग उद्ध्वस्त करण्याचे धाडस काँग्रेस सरकार कधी करील का ? 

 

बेंगळुरू – चामराजपेठे येथील कन्नड साहित्य परिषदेजवळ असलेल्या ३०० वर्षे पुरातन रामेश्‍वर मंदिराची भिंत १ ऑगस्टच्या रात्री पालिकेकडून पाडण्यात आली. तसेच येथील जुनी झाडेही कापून टाकण्यात आली आहेत. यावर स्पष्टीकरण विचारणारे  ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण उपाध्य यांच्यावर नगरसेवक कोकिला यांचे पती माजी नगरसेवक चंद्रशेखर यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून उपाध्य यांना वाचवले. मंदिराच्या आवारात इंदिरा कँटीन का निर्माण करत आहात ? असा प्रश्‍न उपाध्य यांनी विचारला होता. राज्यातील काँग्रेस सरकारने इंदिरा कँटीन नावाची लोकांना अल्पदरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना चालू केली आहे.

हा राजकीय अहंकार सोडून दुसरे काहीही नाही. राजकारण्यांनी अशा रितीने संवेदनशीलता गमावणे योग्य आहे का ? असा प्रश्‍न रामकृष्ण उपाध्य यांनी विचारला आहे. शासनाच्या या कृतीच्या विरोधातील आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपाध्य यांनी केले आहे. विजय टाइम्सचे संपादक असलेले रामकृष्ण उपाध्य वर्ष २०१४ मध्ये बेंगळुरू प्रेस क्लबचे अध्यक्ष होते.