*गोवंश जनावरांसह गोमांस जप्त – शिरजगाव कसबा पोलिसांची कार्यवाही*

0
1219

👉🏻ठाणेदार मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कार्यवाही
👉🏻वाचविले एकूण 13 जनावरांचे प्राण आणि जप्त केले 635 किलो गौवंश  मांस
👉🏻पाच आरोपी अटकेत  तर एक आरोपी फरार

बादल डकरे /  चांदुर बाजार-

 

राज्य सरकार तसेच केंद्र सरकार ने संपूर्ण भारतामध्ये गौवंश हत्या बंदी  कायदा लागू केला असला तरी गौवंश हत्या सुरूच असल्याचे दिसत आहे मात्र आज सकाळी पहाटेच्या सुमारास ठाणेदार श्री मुकुंद कवाडे याना गुप्त माहितीच्या आधारे करजगाव या ठिकाणी आपल्या पोलीस टीम सोबत छापा टाकला असता त्यांना एकूण 635 किलो गौवंश मास आणि 13 जिवंत जनावरे आढळून आली.त्यामध्ये त्यांनी 5 आरोपी याना अटक केली असून एक आरोपी अद्यापही  फरार आहे.

शिरजगाव कसबा येथील  ठाणेदार मुकुंद कवाडे याना माहिती मिळाली  कि करजगाव  या ठिकाणी गोवंश  हत्या सुरु आहे तसेच ठाणेदार कवाडे यांनी आपली पोलीस टीम तयार करून सापळा रचला आणि एकाच वेळी दोन ठिकाणी रेड केली. दिनांक 3 ऑगस्ट  च्या पहाटेच्या 4 च्या सुमारास हे रेड करण्यात आली.मात्र यासाठी पोलिसांना रात्रभर डोळ्यात तेल टाकून नियोजन करावे लागले.

पोलिसांनी करजगाव येथे कुरेशी मोहल्ला रेड केली असता त्यांना अ. जहीर. अ. अजीज वय( 36) रा.करजगाव,अन्सार खा गफरखा वय (35) गवत शात शिरजगाव कसबा,शेख जमीर शेख मुसा( 35)रा.शि कसबा. हे मास कापताना आढळून आले पोलिसांनी त्यांना अटक करून 48 हजारांची मृत जनावरांचे मांस,6 जिवंत गाई 72 हजार रुपये,मोबाइल फोन,MH27 AJ8284 क्रमांकाची बजाज डिस्कवर,टिव्हिएस MH27 S 9344 आणि  315 किलो मास अशा एकूण 2 लाख 1930 माळ जप्त केला आहे

 

तसेच दुसऱ्या कार्यवाही मध्ये शे मुनिर शेख झुबन रा करजगाव, मुजमिल अ. खा हारून खा रा शि कसबा ,यांना अटक केली असून यामधील रशीद कुरेशी हा आरोपी रा गोविंदपूर फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.यांच्याकडून एक मृत गाय,सात जिवंत गाई, स्पेल्डर MH 27 3936, दोन मोबाइल,दोन सायकल,आणि 320 किलो मास अशा एकूण 1 लक्ष 72,530 रुपये चा माल जप्त केला असून जप्त केलेल्या मांसाची तपासणी पशुवैधिकीय अधिकारी एस.डी. मोहोड यांनी केली असून सँपल फॉरेनसिंग लॅब ला पाठविले आहे तसेच जिवंत तेरा गाईना रासेगाव येथील शिवशक्ती गौरक्षण येथे पाठविण्यात आले आहे .आरोपी यांच्या भदवी, पशु संवर्धन कायदा अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.त्याच प्रमाणे पुढील कार्यवाही पोलीस करीत आहे.सदर  कार्यवाही शिरजगाव कसबा चे ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी स्वतः आणि त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक सुबोध वंजारी, पोलीस कॉस्टेबल साहेबरावजी राजस,पोलीस कॉस्टेबल विनोद इंगळे,दिलीप वानखडे(ASI),गोपाळ शिंदे(ASI),पोलीस कॉस्टेबल भुनेश्वर तायडे,गौरव ठाकूर,सुरज भेले,आणि शिरजगाव कसबा येथील पोलीस टीम ने केली.

शिरजगाव कसबा पोलिसांच्या धडक कार्यवाही मुळे करजगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौवंश हत्या होत असल्याचा चर्चा आता संपूर्ण परिसरात होत आहे

– ठाणेदार  मुकुंद कवाडे 

आम्हला मिळालेल्या  गुप्त माहितीच्या आधारे आम्ही सुरुवातीला सापळा रचून करजगाव येथे कुरेशी मोहल्ला एकाच ठिकाणी एकाच वेळेत रेड केली त्यामुळे ही कार्यवाही यशस्वी झाली आहे.कायदा हा सर्वांनी पाळावा तसेच आता परिसरामध्ये शांतता आहे यामध्ये आम्हला अमरावती येथील RCP च्या  पथकाची सुद्धा मदत मिळाली त्याच प्रमाणे शिरजगाव कसबा कर्मचारी यांनी माझे सहकारी यांनी सुद्धा मला या कार्यवाही मध्ये मदत केली.फरार आरोपीचा शोध आम्ही घेत आहे तयाला पण लवकरच अटक करू.