वाशिम येथील वधू पेपर सोडवूनच बोहल्यावर चढली

0
621
Google search engine
Google search engine



महेंद्र महाजन जैन रिसोड/ वाशिम 

वाशिम येथील  समाज सेवक राजू  बळीराम घोंगडे यांची सुकन्या रिना       पेपर सोडवूनच बोहल्यावर चढली . शिक्षणाचे महत्त्व सांगून रिनाने  समाजात आदर्श निर्माण केला .
वाशिम येथील रिना हिचा शुभ विवाह रिसोड येथील  ओंम  जगदीश राऊत यांच्याशी 2 जून ला ठरला .योगायोगाने 2 जून ला यशवंतराव मुक्त विद्यापिठाची परीक्षा  सुरू झाली .रिना यशवंतराव मुक्त विद्यापीठातून बी ए ची  परीक्षा  मातोश्री शांताबाई  गोटे  कला, वाणिज्य ,विज्ञान महाविद्यालयातून देत आहे देत आहे. एकीकडे लग्नाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे परीक्षा सुरू झाली. 2 जून ला लग्न आणि 2 जून ला  च परीक्षा असल्याने  रिणाचे वडील राजू घोगडे यांच्या समोर पेच निर्माण झाला. रिनाने  शिक्षणाला  महत्व देत आधी पेपर सोडविला आणि नंतरच बोहल्यावर चढली . रिना चा शुभ विवाह ओम यांच्यासोबत पार पडला . लग्ना नंतरच्या प्रथा परिक्षा संपल्यानंतरच पार पडतील असे रिनाने सांगितले 10 जून  पर्यंत पेपर सुरू राहणार असून रिना ही सर्वच पेपर सोडविणार आहे