रणरागिणी शाखेकडून अभिनेत्री सनी लिओन यांच्या अश्‍लील संकेतस्थळाच्या विरोधात तक्रार

0
1122
Google search engine
Google search engine

फरीदाबाद (हरियाणा) – हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा आणि अन्य जागृत महिला यांनी येथील सेक्टर २८ मधील पोलीस ठाण्यात अभिनेत्री सनी लिओन यांच्या अश्‍लील संकेतस्थळाच्या विरोधात तक्रार केली. या तक्रारीवर २८ महिलांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

तसेच या संदर्भातील काही कागदपत्रेही जोडण्यात आली आहेत. सनी लियोन आणि त्यांना यासाठी साहाय्य करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यात करण्यात आली आहे. या संकेतस्थळाचा प्रभाव प्रतिदिन वाढत आहे. मूळची कॅनडातील असलेली आणि तेथे अश्‍लील चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री सनी लियोन गेल्या काही वर्षांपासून भारतीय चित्रपटक्षेत्रात काम करत आहे.

त्यातून ती अश्‍लीलतेला प्रोत्साहन देत आहे. भारतीय संस्कृतीत अश्‍लीलतेला कोणतेही स्थान नाही. अश्‍लीलतेचा समाजावर वाईट परिणाम होत आहे. सध्या देशात संस्कृतीचा आदर राखणारे सरकार आहे. आम्हाला विश्‍वास आहे की, सरकार या संकेतस्थळावर कारवाई करील, असे या तक्रारीत म्हटले आहे.

www.sunnyleone.com 

महाराष्ट्रातील डोंबिवली येथे गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही.