शेतक-यांच्या संपूर्ण कर्ज माफी व शेतमालाला हमी भाव मीळावा या मागणी करीता आज महाराष्ट्र बंद ला अचलपूरमध्ये संमिश्र प्रतिसाद

0
654
Google search engine
Google search engine

प्रहार संघटनेने केले अचलपूर बंद चे आवाहन संभाजी ब्रिगेड चा सुध्दा सहभाग

अचलपूर / शहेजाद खान /-

शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला हमी भाव द्यावा याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात शेतक-यांचा संप सुरू असतांना आज 5 जून रोजी विविध संघटनांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले.या बंदला अचलपूरचे आमदार व प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनी आपला पांठीबा जाहीर केला.त्याअनुशंघाने स्थानीक प्रहार संघटनेचे बल्लू जंवजाळ,संजय तट्टे यांचे नेतृत्वाखाली अचलपूर बंदचे आवाहन देण्यात आले.

     शेतक-यांची कर्ज माफी,सातबारा कोरा करणे व शेतमालांला हमी भाव मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षांनी व विविध शेतकरी संघटनांनी 1 जून पासून संप पुकारला व रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन सुरू केले.रस्त्यावर भाजीपाला,दुध व कांदा फेकून निषेध व्यक्त केला.यादरम्यान काही शेतकरी नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून सकारात्मक आश्वासन दिल्याचे प्रसिध्दी माध्यमातून शेतक-यांना सांगण्यात आले परंतू यावर आंदोलनात उतरलेल्या संघटना व राजकीय पक्षांचा निरूत्साह होवून असे आंदोलन मागे न घेता पुर्ण कर्ज माफी व हमी भाव स्वतः मुख्यमंत्र्यांनी बांधावरच्या शेतक-यासोबत चर्चा करून घोषित करावी व त्याची अंमलबजावणी त्वरित करावी या आपल्या मागणीवर ठाम राहून आज 5 जून रोजी महाराष्ट्र बंद पुकारला या बंदला अचलपूर मध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला.सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्यात आली याप्रसंगी शहरातून प्रहार संघटनेचे बल्लू जवंजाळ,नगरसेवक संजय तट्टे,शिवसेनेचे नरेंद्र फीसके यांचे नेतृत्वाखाली दुचाकी रँली चावलमंडी,देवळी या प्रमुख बाजारपेठा बंद करून गांधी पूल येथे समाप्त करण्यात आली.शहरात बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळाला.बँक,पोस्ट आँफीस व बससेवा सुरळीत सुरु होत्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अचलपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आधारसींग सोनोने व सरमसपूरा पोलिस स्टेशन चे ठाणेदार अभिजित अहिरराव यांनी चोख बंदोबस्त ठेवून शांततेत बंद पार पाडला.दुचाकी मोर्चा मध्ये प्रहार संघटनेचे दिपक भोरे,नंदूभाऊ विधळे, दिपक धुळधर, महेश सुरंजे,संतोष बुरघाटे,गजानन भोरे,बंडू ठाकरे,राजू पाटील,साहेबराव मेहरे,रविंद्र भोंडे,आबाराव ठाकरे,मुन्ना शेळके,राहुल तट्टे,प्रशांत आवारे,मंगेश हुड,नितीन आखुड, मुस्तफाभाई, भास्कर मसोदकर,गुलाब डोंगरे,मालखेडे,राठी साहेब, मोहन वानखडे नितीन मांजरे,प्रवीण गुप्ता,नरेंद्र डोईफोडे प्रशांत आवारे,शिवबा काळे व असंख्य कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.त्यांनी मोदीसरकारच्या शेतकरी धोरणा बद्दलच्या उदासीनते विरूध्द घोषणा देवून आपला निषेध नोंदवला व मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा अधिक तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुध्दा देण्यात आला.