पिक कर्ज वितरणासाठी जिल्हा बँक तत्पर – जिल्हाधिकारी

0
830
Google search engine
Google search engine

• जिल्हा बँकेत 10 हजार रूपयापर्यंतच्या मर्यादेत तातडीने पिक कर्ज उपलब्ध
• जिल्हाधिकारी यांच्याहस्ते कर्ज वितरण

बुलडाणा-

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्हा बँकेला संलग्न ग्रामसेवा, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून 10 हजार रूपयांच्या मर्यादेत तातडीने पिक कर्ज वाटप करण्यात येत आहे. या पिक कर्ज वाटपासाठी जिल्हा बँक तत्पर आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.
जिल्हा बँकेच्या सभागृहात पीक कर्ज वाटप शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, सर्व मुख्याधिकारी, विभागीय अधिकारी, चिखली येथील संस्थेचे अध्यक्ष, सचिव व लाभार्थी शेतकरी सभासद उपस्थित होते.
जिल्हा केंद्रीय सहकारी बँक 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकरी सभासदांना खरीप पिक पेरणीसाठी 10 हजार रूपयांच्या मर्यादेत तातडीने पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. यासाठी 14 व 20 जून 2017 च्या शासन निर्णयास अधिन राहून पात्र सभासदांना खरीप पिक पेरणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. संबंधित संस्थेचे गटसचिव/ संलग्न बँक शाखेमध्ये सादर करून 10 हजार रूपयांच्या मर्यादेपर्यंत तातडीने कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
पात्र शेतकरी सभासदांनी स्वयंघोषीत शपथपत्र, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीसाठी पात्र सभासदांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची पावती, सभासदाचा 7/12, गाव नमुना 8 –अ, कलम 48 अंतर्गत घोषणापत्र, मोबाईल क्रमांक नमूद करून स्वत:च्या सहीने प्रमाणीत केलेल्या आधार कार्डची छायांकित प्रत, मतदान ओळखपत्र, असल्यास पॅन कार्डची छायांकित प्रत, रेशन कार्डची छायांकित प्रत, बँकेचा विहीत नमुन्यातील किसान क्रेडीट कार्डचा अर्ज, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र,