​*श्री शिवछत्रपती आणि श्री भवानी माताबाबत फेसबुकवर निंदनीय लिखाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल !*

0
586


हिंदुस्थानचे आराध्यदैवत  छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दल आणि श्री भवानीमातेबद्दल फेसबुकवर  नितिन मोहिते याने अत्यंत अश्लिल शब्दात लिखाण केले असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना मिळाली. 

सदर नितीन मोहिते या इसमाच्या पोस्टबद्दल फेसबुक आणि whtsp वर राग व्यक्त केला जात होता.  या सर्व प्रकाराबाबत *नालासोपाराचे धारकरी* श्री. नितीनदादा पालशेतकर, अरविंदराव मोरे तसेच विरारचे धारकरी मंदारराव शिंदे, सचिन गोरिवले, नितेश पाटील आणि ओमकार माने यांनी यावर तात्काळ पाउले उचलत नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री. भरत जाधव यांना निवेदन दिले. या प्रसंगी शिवसेनेचे  नालासोपारा विभाग प्रमुख श्री. जितेंद्र हजारे हे ही उपस्थीत होते.

यावेळी सर्व धारकऱ्यांनी वरिष्ठ पोलीसांना नितिन मोहितेवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी ही विनंती केली आणि त्यावर वरिष्ठ पोलीसांनी मोहितेवर FIR दाखल केल्याची माहिती दिली.

या प्रकरणाची दखल घेत  शिवसेना, मनसे आणि इतर सर्व ज्ञात अज्ञात हिंदुत्ववादी बांधवांनी पुढाकार घेउन शिवछत्रपती आणि भवानीमातेची बदनामी करणाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला
तसेच कार्यतत्परता दाखवल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जाधव, शिवसेना विभाग प्रमुख श्री. जितेंद्र हजारे आणि शिवप्रतिष्ठानचे सर्व धारकरी श्री. नितीनदादा पालशेतकर, मंदार शिंदे, अरविंद मोरे, सचिन गोरिवले, नितेश पाटील आणि ओमकार माने यांचे आभार मानले