​*अचलपूर परतवाडा रोडवर अपघात,चालक व सहकारी फरार*

0
988
Google search engine
Google search engine

श्री प्रमोद नैकेले/अचलपूर


:-अचलपूर परतवाडा रोडवर दुलारहमानशा दरवाज्याजवळ बिच्छन नदीच्या पुलावरून टवेरा चारचाकी गाडी पच्चवीस ते तीस फुट नदीपात्रात कोसळली सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

सविस्तर वृत्त असे की अचलपूर कडून परतवाडा कडे जात असलेली टवेरा गाडी  क्रमांक mh.32C 7289 गाडगे बाबा पाणेरी जवळील बिच्छन नदी पुलावरून कोसळली कार क्षतीग्रस्त झाली. घटनास्थळावरून चालक बेपत्ता  माञ दुर्घटने दरम्यान चार व्यकती धावत गेल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगतिले जीवितहानी झाली नाही.अचलपूर पोलिसांना चौकशी दरम्यान कार मधून उत्तरप्रदेश येथील दस्तावेज मिळाले.कार वर्धा पासिग असून कारचे मालक नागपुरातील उमेशकुमार असल्याचे कळले.कारचे मोठे नुकसान झाले असून अचलपुर पोलिस स्टेशन चे अधिकारी ब्राम्हणे पुढिल तपास करत आहे.वार्ता कळताच घटनास्थळी बघ्याची गर्दी जमली होती.या कारमधून बरेच इलेक्ट्रॉनिक व इतर साहित्य बाहेर पडलेले दिसले व आत लकी कुपन्स सुध्दा सापडले यावरून या कारमधून लकी कुपन देवून घरोघरी बक्षीस रुपाने वस्तू वीकणारे विक्रेते असण्याची चर्चा होती.