बडनेऱ्यात मुस्लिम बांधवांनी केले संघ पथसंचलनाचे स्वागत नागरिकांचा अपूर्व उत्साह !

382

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचा वीस दिवसांचा प्रशिक्षण वर्ग सध्या बडनेरा शहरात अंजनगाव बारी मार्गावर टायटन पब्लिक स्कुलमध्ये सुरू आहे. आज बडनेरा जुन्यावस्तीत निघालेल्या संघाच्या पथसंचलनाचे मुस्लिम बांधवांनी प्रचंड उत्साहात स्वागत करून भारताचा जयघोष केला.
या शिबिरार्थी स्वयंसेवकांचे पथ संचलन  मंगळवार, 30 मे 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजता निघाले. नागरिकांनी रांगोळ्या काढून, पथसंचलनावर पुष्पवर्षाव करून अभूत पूर्व स्वागत केले. संपूर्ण जुन्या वस्तीत देशभक्तीचा माहोल उसळला होता. मुस्लिम बांधवांनी स्वागतानंतर आपल्या पवित्र रमझान महिन्यातील रोझाचा उपवास सोडला.रा स्व स संघाचे शिबिर अथवा 
पथसंचालन गणवेष ह्या सर्व बाबी अत्यंत शिस्तबद्धतेचे प्रमाण आहे…. संघाचा सातत्त्याने चालणारा प्रचार , बदलती सकारात्मक राजकीय परिस्थिती , आणि मुस्लिम व इतर धर्मीयांच्या मनात जाणून बूजून संघाविषयी निर्माण केलेली तेढ नाहीशी होऊन सत्य सर्वाना समजेल की संघ हा फक्त त्याग शिस्त देशभक्ति शिकवतो….अयोजकांचे ,सर्वच मुस्लिम बांधवांचे व परस्पर सरूदयता जपणार्ऱ्या नागरिकांचे मनस्वी अभिनंदन….
जाहिरात