राष्ट्रसेवा दल अचलपूर तर्फे जागतिक महिला आरोग्य दिन संपन्न

0
590
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-

28 मे हा दिवस ‘मेन्स्ट्रल हायजिन डे’ म्हणून साजरा करण्यात येतो यानिमीत्त स्थानीक माळवेशपुरा येथे अचलपूर राष्ट्रसेवा दल यांचे तर्फे जागतिक महिला आरोग्य दिन साजरा करण्यात आला.
     जागतिक महिला आरोग्य दिनानिमीत्त स्थानीक माळवेशपूरा येथे 24 मे रोजी कल्पना वाघमारे यांचे निवासस्थानी अचलपूर राष्ट्रसेवा दल यांचे सहाय्याने आयोजित कार्यक्रमात वर्षा पांडे प्रमुख अतिथी म्हणुन बोलतांना मासीक पाळीच्या काळात स्त्रियांनी आहाराची काळजी व शारिरीक स्वच्छता कशी राखावी याबद्दल मार्गदर्शन केले.ज्योती कोरडे,लताताई धोटे,सुहासीनी शेंगर,दलालताई,किरण निवाणे व सु्र्वणा वाडेकर यांनी स्वच्छता अभियान,स्त्रीपुरुष समानता,अंधश्रद्धा,वैज्ञानिक दृष्टीकोन याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला स्त्री मुक्ती गीताने प्रारंभ झाला दिपाली चवरे यांनी प्रास्ताविक,संचलन स्वाती घुटे तर आभार प्रदर्शन सुनंदा मडघे यांनी केले याप्रसंगी श्रुती चावरे यांनी आई स्वलीखीताचे अभिवाचन केले कार्यक्रमाला असंख्य महिला उपस्थीत होत्या.