राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वीचा निकाल शंभर टक्के

0
658
Google search engine
Google search engine

अचलपूर / विशेष प्रतिनिधी –

महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळ पुणे चा एच.एस.सी.निकाल नुकताच जाहिर झाला.त्यामध्ये अमरावती विभातील अचलपूर तालुक्यातील राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला.
       अचलपूर तालुक्यातील नावलौकिक राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय येथे विज्ञान शाखेत 84 विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी सर्व 84 विद्यार्थी उतीर्ण होवून उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.प्रावीण्य श्रेणीत 18, प्रथम श्रेणीत 51 तर द्वितीय श्रेणीत 15 असे सर्व विद्यार्थी यशस्वी झाले.व्यावसायिक अभ्यासक्रम एम.सी.व्ही.सी. मध्ये अँटो इंजिनिअरींग,बिल्डिंग मेटेंनन्स व ईलेक्ट्रीकल मेटेंनन्स अशा तीन शाखा मीळून 66 विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी प्रावीण्य श्रेणीत 1,प्रथम श्रेणीत 5,द्वितीय श्रेणीत 27 व तृतीय श्रेणीत 1 असे एकुण 34 विद्यार्थी  होवून त्यांचा 51.51 टक्के निकाल लागला.विज्ञान शाखेच्या व एम.सी.व्ही.सी.च्या यशाबद्दल पब्लिक वेलफेअर सोसायटी या मातृसंस्थेचे अध्यक्ष संजयकुमार रतनकुमारजी चौधरी,सचिव अनिलबाबू मदनगोपालजी चौधरी व व्यवस्थापक मंडळाचे सर्व सदस्य यांनी शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.तसेच एकता (92.15), निकीता मुंगणे (89.07),फरीन फिरदोस ,(88) व प्रतीक सुने(85.84) टक्के गुण मीळाल्याबद्दल प्राचार्य प्रमोद नैकेले,उपप्राचार्य सुनिल झंवर,पर्यवेक्षक ममता तीवारी,जेष्ठ विज्ञान शिक्षक एम.के.येवूल व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

वर्ग 12 वी चा निकाल 2017
विज्ञान शाखा

एकुण विद्यार्थी 84
उर्तीण.           84
प्रवीण्य श्रेणी.  18
प्रथम श्रेणी.     51
द्वितीय श्रेणी.   15
पास श्रेणी.      —–
शेकडा प्रमाण  100%
————————————————————————- 
एम.सी.व्ही.सी. विभाग
एकुण विद्यार्थी.  66
उर्तीण.             34
प्रावीण्य श्रेणी.   01
प्रथम श्रेणी       05   
द्वितीय श्रेणी.    27
पास श्रेणी.       01
शेकडा श्रेणी.    51.51%
—————————————————————————
                                 प्राचार्य
                         पि.एस.नैकेले
   राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय अचलपूर शहर