माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेचे विष्णूपंत भुतेकरांकडून स्वागत

0
799

   रिसोड / महेंद्र महाजन जैन 



-भारताचे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा नुकताच शिवसंग्राम मध्ये प्रवेश झाला. शिवसंग्राम अध्यक्ष आमदार विनायक मेटे याच्या उपस्थितीत झालेल्या मोहितेच्या प्रवेश सोहळ्यात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.सुबोध मोहिते यांची शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.वाशिम जिल्ह्यातील शिवसंग्रामचे नेते विष्णूपंत भुतेकर यांनी सुबोध मोहिते यांचा जिल्ह्याच्या वतीने यथोचित सत्कार केला. मोहिते यांच्या प्रवाशाने शिवसंग्राम च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या राजकीय अनुभवाचा व जनसेवेच्या अनुभवाचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रभर पक्ष संघटन वाढीकरिता होणार आहे असे मत प्रसंगी विष्णुपंत भुतेकर यांनी व्यक्त केले.