जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचा मेळघाटात दौरास्मार्ट व्हिलेज हरिसालमध्ये पवनऊर्जा निर्मिती केंद्र

0
879
Google search engine
Google search engine
अमरावती :-  
डिजीटल ग्राम हरिसाल येथे वीजेच्या पुरेशी उपलब्धतेसाठी पवनऊर्जा निर्मीती केंद्र उभारण्यासह इतर सर्व सेवा सक्षम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज हरिसाल येथे दिले.
जिल्हाधिकारी श्री. बांगर आजपासून दोन दिवसांच्या मेळघाट दौ-यावर आहेत. त्यांनी आज डिजीटल ग्राम हरिसालला भेट देत तेथील विविध कामांची पाहणी केली. यावेळी श्री. बांगर यांनी तेथील अधिकारी- कर्मचा-यांसह नागरिकांशीही प्रत्यक्ष संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. धारणी येथील उपविभागीय अधिकारी विजय राठोड, तहसीलदार श्री. देवकर, मायक्रोसॉफ्टच्या श्रीया रंगराजन, अरुण जॉर्ज आदी यावेळी उपस्थित होते.
डिजीटल सुविधा् व गावाची गरज पाहता पवनऊर्जेमुळे शाश्वत ऊर्जा मिळून सर्व सुविधा अधिक परिणामकारक होतील. त्यामुळे पवनऊर्जा निर्मिती केंद्र उभारण्यासाठी जिल्हा स्तरावरुन निधी देण्यात येईल. त्यासाठीचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात यावा, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले.
विद्यार्थ्यांशी संवा
हरिसाल येथील डिजीटल क्लासरुमला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या शिक्षणाची माहिती घेत त्यांना उपयुक्त सूचनाही केल्या. या क्लासरुममध्ये एमएचसीआयटी कोर्सही सुरु करण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी अंगणवाडी ग्राम बाल विकास केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध सुविधांची, तसेच अमृत आहार योजनेंतर्गत गरोदर व स्तनदा मातांना मिळणा-या सुविधांबाबत माहिती घेतली.

प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

पावसाळा लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्रात संसर्गजन्य रोगांवरील, सर्पदंशावरील लसीचा पुरेसा साठा ठेवण्यात यावा. आरोग्य उपकेंद्रे, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्याकडे ओआरएस उपलब्ध असले पाहिजे, असे निर्देश श्री. बांगर यांनी दिले. परिसरातील नागरिकांचे काही कालावधीतील स्थलांतराचे प्रमाण पाहता मुलांच्या लसीकरणाच्या नोंदी नेमकेपणाने घ्याव्यात, लसीकरणापासून कुणीही वंचित राहता कामा नये, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी नेत्रोपचार केंद्रातील यंत्रणेची पाहणी केली. नेत्रोपचाराप्रमाणेच ज्येष्ठांसाठी चष्मेवाटपाची तरतूद करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणा-या रुग्णांना टेलिमेडिसिन केंद्राद्वारे विशेष तज्ज्ञांच्या तपासणी व सल्ल्याचा लाभ मिळतो. परिसरातील इतरही आरोग्य केंद्रांना या सुविधेशी जोडून घ्यावे, तसेच येथील सोनोग्राफी यंत्रणा रेडिओलॉजिस्टअभावी वापर थांबता कामा नये. आरोग्य यंत्रणेच्या रेडिओलॉजिस्टने येथे आठव़ड्यातून  एकदा नियमित भेट द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
केंद्रातील रजिस्टरमधील नोंदी श्री. बांगर यांनी तपासल्या व त्यात सूचनांची नोंदही केली.
कुपोषणावर मात करण्यासाठी आरोग्याच्या सर्व योजना काटेकोरपणे अंमलात आणाव्यात, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.                                     
                                                        सेतु सुविधा केंद्र
सेतु सुविधा केंद्रात सातबा-यासह आवश्यक दस्तावेजांसाठी अर्ज करण्याची सुविधा मिळाली आहे. हे दस्तावेज तपासणी करुन डिजीटल स्वाक्षरी होऊन केंद्रातच मिळावेत, तसेच केंद्राला डिजीसेवा व इतर ऑनलाईन सेवाही जोडून घ्याव्यात, असे आदेश श्री. बांगर यांनी यावेळी दिले. येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन तेथील धान्य साठा, वितरण व्यवस्था व रजिस्टरची तपासणीही त्यांनी केली.
ग्राम सचिवालयात सुरु करण्यात आलेले ग्रंथालय चांगले आहे. या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा ग्रंथालय सुरु करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. हरिसालनंतर श्री. बांगर यांनी मेळघाटातील इतरही काही गावांना सायंकाळी भेट देऊन गावक-यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.