अवकाळी पावसानं, आलं डोळ्यामधी पाणी गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी गजल मैफिलीतून मांडल्या शेतकऱ्यांचा व्यथा

0
1097

चांदूर रेल्वे / शहेजाद खान /-

” अवकाळी पावसानं, आलं डोळ्यामधी पाणी,
 सांग आता कसा गाऊ, निळ्या आभाळाचं गाणी ”
देशातील शेतकऱ्यांची  स्थिती बिकट आहे. अवकाळी पावसाने, खुप पाऊस पडल्याने विंâवा कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे  मोठे नुकसान होते. एखाद्या वर्षी प्रमाणात पाऊस पडला तर भरपूर पिकते. तरी देखील तूर पडून राहते. तिला भाव मिळत नाही. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी सापडलेला आहे. त्यांचे दुःख गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी आपल्या गजलेतून
मांडले.‘ आम्ही सारे ‘फांऊडेशन, चांदूर रेल्वे व्दारा गजलनवाज भीमराव पांचाळे यांचे ‘प्राणात चंद्र ठेवू ‘ या गजल मैफिलचे आयोजन स्थानिक जि.प.हायस्कूल च्या प्रांगणावर केले होते. यावेळी गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी जातीपातीच्या मानसिकतेतून बाहेर पडा आणि माणसा सारखे वागा अशी आर्त हाक

‘‘ वाचलेला, एैकलेली माणसं गेली कुठे?
 पुस्तकातून पाहलेली माणसं गेली कुठे?
 रोज अत्याचार होतो आरश्यावरती आता,
 आरशाला भावलेली माणसं गेली कुठे ?‘‘ 

या गजलेतून मांडली. दररोज देशात काही ना काही घडते, त्यावर न्युज चॅनलवर केवळ रोज चर्चा होते. त्यातून काही हाती पडत नाही. शेतकऱ्यांना  सेंद्रीय शेती करा, शेतीसोबत जोडधंदा करण्याचे फुकटचे
सल्ले दिले जातात.ऐवढचे नव्हे तर त्यांच्या आत्महत्येचे खापर त्यांच्याच डोक्यावर फोडल्या जाते. त्यावर भीमराव पांचाळे यांनी गझलकार नितीन देशमुख यांच्या

‘‘ जळणाऱ्याना  विस्तव कळतो, बघणाऱ्याना  नाही.
 जगणाऱ्याळा  जीवन कळतं,पाळणाऱ्याना  नाही.‘‘

गजलेतून शेतकऱ्यांचे  वास्तव मांडले. तर ‘‘जो नको, तोच प्रकार मी केला. या जगाचा विचार मी केला ‘‘ तर ‘ थंडी हवा झोके चलते हलके हलके, तेरा प्यार हि दौलत है। तेरा दर्द ही दौलत है। ‘या गजलेतून श्रोत्यांना प्रेमरसात चिंब ओले केले. माणसाला भौतीक सुख नको असून प्रेम हवं आहे. हे भीमराव पांचाळे यांनी ‘‘ हवे ते मिळे ना, नको ते मिळे.तुला काय मांगू, मला ना कळे. मझ नको, दे जरा दे मनाचा रिता गोडवा ‘‘ व ” दुःख माझं अंतरीचे वेचनारा पाहिजे, ओघळणाऱ्या आसवांना झेलणारा पाहिजे, आता असं करू या, प्राणात चंद्र ठेवू ‘‘ या गजलमधून अतिशय सुंदरपणे मांडले.‘‘ तु नभातलं तारे माळलेस का तेव्हा
? माझीया स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ? आज का तुला माझे ऐवढे रडू आले, तु चित्तेवरी अश्रू का ढासलेस तेव्हा ?‘‘ यासह ‘‘ तु हासलीस की सगळ्या काट्याची मखमली होते, तु भेटलीस तेव्हा खडकांची हिरवळ होते ‘‘असे एकाहून एक बहारदार गजल सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. शेवटी भीमराव पांचाळे यांनी ‘‘गरीबाच्या लग्नाला, नवरी गोरी काय, काळी काय़ महागाईने पिचलेल्यांना, होळी काय दिवाळी काय़ ‘‘ या गजलेतून सर्वसामान्यांचे वास्तव मांडले. या गजल मैफिलीचे बहारदार सुत्रसंचालन किशोर बळी यांनी केले.या गजल मैफिलीला मोठ्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाला ‘ आम्ही सारे ‘चे अविनाश दुधे, चंद्रकांत वानखडे, अर्जुन ठोसर, विजय विल्हेकर, चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे , संतोष अरसोड, प्रा.संजय वानखडे, प्रा.संजय घरडे, नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी, ठाणेदार ब्रम्हानंद शेळके उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एसडीओ ललीत वऱ्हाडे , प्रा.प्रसेनजित तेलंग, अजय वाघ, भूषण नाचवणकर,
श्रीकांत चौधरी, सचिन जाधव, डॉ.गणेश वऱ्हाडे , विपीन देशमुख, संजय चौधरी, प्रदीप गायकवाड, प्रमोद भागवत, शरद राऊत,
गणेश गावंडे, श्री.चव्हाण, हमीद पठाण, अमोल गवळी, प्रा.रवींद्र मेंढे, संतोष कडू, रितेश जगताप यांनी परिश्रम घेतले.