चांदुर रेल्वेत दुर्गामातेला शांततेत आणि भावपूर्ण निरोप

0
643
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे (शहेजाद  खान) –
तालुक्यात रविवारपासुन दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप देण्याला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी शहरातील नगर नवदुर्गा मंडळ, मेहेर नवदुर्गा मंडळ, आझाद नवदुर्गा मंडळ, सार्वजनिक नवदुर्गा मंडळ, जय भवानी नवदुर्गा मंडळ, नुतन नवदुर्गा मंडळ असे एकुण 6 मंडळाच्या दुर्गादेवींना ढोल ताशाच्या गजरात उत्साहात निरोप देण्यात आला.

गेले नऊ दिवस रासगरबा आणि दांडीयासह अनेक धार्मिक कार्यक्रमांनी गाजत असलेल्या नवरात्रौत्सवाची रविवारी दुर्गामातेच्या विसर्जनाने सांगता झाली. अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात ते पार पडले. विविध दुर्गामंडळांनी डीजे, ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत मिरवणुकीत सहभाग घेतला. यामध्ये तरूणांचा मोठा सहभाग होता. तर महिलांनीही आपापल्या दुर्गादेवी मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीत चांदुर रेल्वे शहरातील ब्रहांडनायक प्रतिष्ठानचे ढोल, ताशा व ध्वज पथक लक्षवेधक ठरले. विसर्जनाच्या मिरवणूकींसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.