रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरने सोनगाव-शिवनी खदानातुन गौणखनिजाची लुट – तलाठी, अधिकारी व गौण खनिज वाहतूकदार यांच्यात मिलीभगत असल्याची चर्चा ?

0
575
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरने सोनगाव – शिवनी खदानातुन गौण खनिज संपत्तीचे बेकायदा उत्खनन तसेच वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. स्थानिक उपविभागीय अधिकारी व तहसिलदार निवासस्थानी राहत नसल्यामुळे त्यांचे दुर्लक्ष होत असुन तलाठी,  इतर अधिकारी व गौण खनिज वाहतूकदार यांच्यातील “मिलीभगत‘मुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असल्याचे समजते.

तालुक्यातील सोनगाव – शिवनी खदानातुन रात्रीचे गौण खनिजाचे उत्खनन तसेच वाहतूक सुरू आहे. अनेक ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमधून गौण खनिजाची चोरटी वाहतूक चालू आहे. त्यामुळे शासनाच्या संपत्तीची लाखोंची लूट होत आहे. चांदुर रेल्वे शहरातुन अनेक वाहतुकदारांचे ट्रॅक्टर रात्री 2-3 वाजताच्या सुमारास सोनगाव येथे जाऊन गौणखनिज उत्खनन करून वाहतुक करीत असल्याचे समजते. सदर प्रकार हा तलाठ्यांसह महसुल विभागातील कर्मचाऱ्यांना माहित असतांना सुध्दा चिरीमिरीपोटी याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. स्थानिक उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना सक्ती असतांनासुध्दा ते निवासस्थानी राहत नसल्यामुळेच याचा फायदा रात्री गौणखनिज उत्खनन करणाऱ्यांना होत आहे. शासनाचा लाखोंचा बुडत असलेला महसुलला अंकुश लावुन या वाहतुकदारांवर दंडात्मक कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे आहे.