एकाच वेळेस 4 नवजात बालकांचा मृत्यू ……?- पंजाबराव हॉस्पिटल मधील प्रकार -डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0
550
अमरावती:-
अमरावती – येथील  स्थानिक पंचवटी पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी ४ नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चारही नवजात मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. काल रात्री ही घटना घडली आहे.
पंजाबराव देशमुख रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून लोक उपचारासाठी येत असतात. या चारही बालकांच्या मृत्यूने एकच खळबळ माजली आहे. रुग्णालयात काही उपचार सुरु असतानाच बालकं दगावल्याची माहिती समजते आहे. एकाच वेळी चार नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.