● नरभक्षक वाघीणीला पकडण्यासाठी रेस्कु ऑपरेशन जारी. ● घोराड परीसरातील लेंडी नाल्यात वाघिणीचा ठिय्या.

0
1473
Google search engine
Google search engine

वरूड (अमरावती) – तालुक्यातील सोमवार रोजी शहापूर शेतशिवारात कन्हाेत्री हिरालाल नवडे वय ६० रा. चिलाेठी ता. मुलताई हीला ठार मारल्यानंतर वनविभागाचे व वाघ नियंत्रक पथकाचे रेस्कु ऑपरेशन सुरू झाले. रात्री रोशनखेडा परीसरात असल्याची माहीती मिळाल्यानंतर शहरात भितीचे वातावरण होते. रात्री दोन वाजपर्यंत सोशल मिडीयावर त्या नरभक्षक वाघिणीची चर्चा सुरू होती. मंगळवारी सकाळी ५ वाजता तालुक्यातील घाेराड शेतशिवारात असल्याची माहीती मिळताच रेस्कु ऑपरेशन सुरू झाले. वनविभागाचे कर्मचारी, वाघ नियंत्रक पथक व वरूड पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. वाघिणीचा शोध घेण्यासाठी हत्तीला आणण्यात आले. वाघिणीला पकडण्यासाठी चार जणांनी हत्तीवर बसुन लेंडी नाल्याच्या दिशने गेले. सदर, वाघिण लेंडी नाल्याच्या जुळपात असल्याची माहीती मिळाली खरी परंतु त्या ठिकाणापर्यंत पोहचण्यासाठी कुणाचाच उपाय चालला नाही. घनदाट असलेल्या लेंडी नाल्यातील काटेरी जुळपात असल्याणे हत्ती तर सोडा धड माणसालाही त्या ठिकाणी पोहचे शक्य नव्हते. त्यामुळे हत्ती लेंडी नाल्याच्या अासपास फिरून परत आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा दुसरा हत्ती आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पाच वाजेपर्यंत वाघिणीला पकडण्यात रेस्कु ऑपरेशनला यश मिळाले नाही. मंगळवारी सकाळी पाच वाजतापासुन सुरू झालेले हे रेस्कु ऑपरेशन दुपारी ५ वाजेपर्यंत सुरू राहीले परंतु त्या वाघिणीला पकडण्यासाठी हे रेस्कु ऑपरेशन कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती. घटनेची माहीती वाऱ्यासारखी पसरताच नागरीकांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली होती. परंतु पोलीसांनी गर्दीला पांगवण्यासाठी प्रयत्न केले. तरीही वाघिणीला शोधण्यात संबंधित अधिकाऱ्यांना यश आले नाही. वनविभागाचे कर्मचारी, वाघ नियंत्रक पथक व पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालुन त्या वाघिणाीचा शोध घेत आहे. सदर वाघिण ही नरभक्षक झाली असुन ती जंगलात न राहता गावाकडे तीचा कल आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले असुन वाघिणीला पकडणे गरजेचे झाले आहे. अन्यथा कन्हाेत्री सारख्या निष्पाप लोकांचा बळी जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. यावेळी नागपूरचे मुख्य वनसंरक्षक प्रविन चव्हाण, जिल्हा वनपरीक्षेत्र अधिकारी मसराम, सहाय्यक वनपरीक्षेत्र अधिकारी आर. जे. बोंडे, सहाय्यक वनपरीक्षेत्र अधिकारी कविटकर तसेच वरूडचे वनपरीक्षेत्र अधिकारी दादाराव काळे यांच्या मार्गदर्शनात शोध मोहीम सुरू आहे.
————
वाघिणीला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न ?
————
गेल्या दोन महीण्यापासुन विदर्भातील ब्रम्हपुरी, आष्टी व आता अमरावती जिल्हातील वरूड परीसरात एकाच वाघिणीने जवळपास सात ते आठ निष्पाप लोकांचा बळी घेतला. वनविभागाचे कर्मचारी व वाघ नियंत्रक पथकाने ब्रम्हपूरीतील घटनेनंतर मोठ्या प्रयत्नाने तीला जेरबंद केले होते. व नंतर त्या वाघिणीला परत जंगलात सोडले त्यामुळे आष्टी आणी वरूड तालुक्यातील दोन लोकांचा बळी गेला त्यामुळे त्या वाघिणीला पकडण्यासाठी वाघ नियंत्रक पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.