*अचलपूर शहरातील नवदुर्गा विसर्जन व मोहरमच्या विसर्जनावर महावितरणचा काळोख*

0
607
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-

अचलपूर शहर हे अतिसंवेदनशील शहर असून जरी सर्व धर्मीय लोक एकोप्याने येथे राहतात तरी छोट्याश्या कारणावरून केव्हाही शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तरी नवरात्र व मोहरम च्या विसर्जनावर महावितरणने काळोख पसरवून उत्साहावर विरजन टाकले.
अचलपूर या जुन्या शहरात सर्व धर्मीय लोक एकोप्याने राहतात व आपले उत्सव शांततेत पार पाडतात परंतू काही समाजकंटकाच्या मुळे येथे वारंवार झालेल्या जातीय दंगली मुळे या शहराला अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळख प्राप्त झाली.शहरात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण बिघडण्याचे प्रसंग सुध्दा धार्मिक ऊत्सवाचे दरम्यान घडले.याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे 2007 मधील घटना दुर्गा विसर्जना चे निमित्त साधून त्यावेळी समाजकंटकांनी शांतता भंग केली त्यामुळे सर्व धर्मीय नागरिकांना त्रास सहन करावा लागला.असे प्रसंग पुन्हा होऊ नये अशी सर्वांचीच सदिच्छा म्हणुन काही वर्षांपुर्वी शहरातील सर्व धर्मीय नागरिक,सर्व पक्षीय राजकीय पुढारी व त्यांचे कार्यकर्ते व सर्व संघटनांनी मीळून संत गाडगे महाराज तक्रार निवारण समितीचे नेतृत्वाखाली एक दिवस शंभर टक्के शहर स्वईच्छेने बंद ठेवून तत्कालीन उपविभागीय अधिकारी व कार्यकारी अभियंता यांना निवेदन देवून भारनियमन बंद करण्याची विनंती केली तसेच याप्रसंगी विशेषता रात्रीचे भारनियमन करू नये हा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला तेव्हां तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेऊन महावितरणच्या वरिष्ठ वर्गाला ही गोष्ट लक्षात आणून दिली.महावितरणनेसुध्दा ही बाब समजून घेऊन शहरातील भारनियमन बंद केले पण या वर्षी पुन्हा शहरात दिवसा व रात्री असे सहा तासाचे भारनियमन करून यावरच समाधान झाले नाही तर दिवसातून केव्हाही विद्युत पुरवठा खंडीत करून नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहत आहे.एवढेच नव्हे तर शहरात यावर्षी नवरात्र व मोहरम एकत्र आले व मोहरम विसर्जन 2 आक्टोंबर व दुर्गा विसर्जन 3 व 4 आक्टोंबरला होते दोन्ही धर्मीय भाविक मोठ्या संख्येने आपआपल्या विसर्जन मिरवणूकी मध्ये सहभागी झाले असतांना सुध्दा रात्री आठ वाजेपर्यंत भारनियमन करून निराशा केली.महावितरणला याबद्दल विचारणा केली असता विजगळती व विजचोरी चे कारण दाखवून भारनियमन केल्या जात आहे असे सांगून वेळ मारून नेत आहेत.विजचोरी वर कार्यवाही राहिली दूर जे प्रामाणिक पणे व नियमित विज देयक भरतात त्यांना मात्र वेठीस धरल्या जात आहे हा अन्यायकारक निर्णय मागे घेतला नाही व रात्रीचे भारनियमन बंद झाले नाही तर जनतेचा असंतोष वाढून पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनतेने दिला आहे