बुलेट ट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले – श्री राज ठाकरे

0
1303

आज रेल्वे मुख्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विराट मोर्चानंतर मराठीहृदयसम्राट मा.राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मांडलेले महत्वाचे मुद्दे

मेट्रोला भेटू असं म्हटलं नशीब तुम्ही मित्रो असं ऐकलं नाही,

मध्य रेल्वे-पश्चिम रेल्वे वरचे फेरीवाले १५ दिवसाच्या आत उठवा नाही तर १६व्या दिवशी माझे सहकारी ते काम करतील,

किड्या-मुंग्यांसारखी माणसं मरतायत आणि यांच्या उच्चस्तरीय बैठका काय करायच्या? ,

आजचा मोर्चा हा रेल्वेपुरता मर्यादित नाही सरकार बदललं तरी परिस्थिती जैसे थे म्हणून माझा संताप,

महिलांसाठी गाड्या वाढवा सांगितलं तर अधिकारी लिहून घेत होते जसं आम्ही काही नवं सांगितलं, तुम्हाला नाही कळत?

, मोदींवर माझ्यासकट या देशाने विश्वास टाकला पण संपूर्ण सत्ता देऊन काय कारभार चालू आहे म्हणून माझा संताप आहे,

नितीन गडकरी म्हणतात अच्छे दिन हे गळ्यातलं अडकलेलं हाड म्हणजे अच्छे दिन येणारच नाहीत!

,रेल्वेच्या समस्या नव्या नाहीत, किती वेळा लोकांनी मांडल्या पण काही नाही

,ती चेंगराचेंगरी पाहवत पण नव्हती, काय दयनीय परिस्थिती करून ठेवलीय देशाची!

, उर्जित पटेल म्हणतात देशात मंदी वाढणार म्हणजे काय बेरोजगारी वाढणार

, सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढून टाकलं. फक्त २-३ माणसं देश चालवणार का? बाकीच्यांना काही कळत नाही का?

, बुलेट ट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले

, मुठभर लोकांसाठी बुलेट ट्रेन आणि १.१० लाख कोटींच कर्ज देश फेडणार