महाराष्ट्र सदनात महाराणा प्रताप सिंह जयंती साजरी

0
1206
Google search engine
Google search engine

 
नवी दिल्ली :-
 शुर योध्दा महाराणा प्रताप सिंह यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. 
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सचिव तथा आयुक्त आभा शुक्ला यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी इशू संधू,  अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.