*कांदा व्यापाऱ्याने केली शेतकऱ्यांची फसवणूक ! तर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ*

0
622

अहमदनगर / *प्रतिनिधि – ऊमेर सय्यद*

अहमदनगर तालुक्यातील नांदगाव येथील जाधव वस्ती वरील 6 शेतकऱ्यांकडून 10 लाख 8 हजार 909 रुपयांचा कांदा गेल्या तीन महिन्यापूर्वी घेवुन गेलेल्या विलास दांगट या व्याप्याऱ्याने अद्याप देखील या शेतकऱ्यांना त्यांचा पैसा दिलेला नाही ! त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांची फसवणूक जाली असून त्या दांगट व्याप्यारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जाधव वस्ती वरील शेतकऱ्यांनि केली आहे ! दरम्यान आपली फसवणूक वाबोरी तालुक्यातील कात्रड येथील व्यापारी दांगट यानी केली असल्याची लक्षात येताच नांदगाव येथील जाधव वस्तीवरील शेतकऱ्यांनी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली मात्र गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस अधिकारी शेतकऱ्यांची दिशा भूलकरून त्या व्याप्यार्यावर गुन्हा दाखल करत नसल्याची टीका जाधव वस्तीवरील शेतकऱ्यांनी केली आहे ! फसवणूक जालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांने आपल्या शेतातुन भर उन्हात कांदा काडुन या व्यापारी ला विकले मात्र कांदा नेल्यानंतर लगेच कांद्यांचे 10 लाख रुपयांची रक्कम पाठवून देतो अस सांगणार्या त्या व्यापारी दांगट याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे तर पोलीस प्रशासन देखील त्या व्यक्तिवर गुन्हा दाखल करत नसल्याने आता आम्हांला कोण न्याय मिळवून देणार असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे ! तरी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या कांदा व्यापारी विलास दांगट आणि भाऊसाहेब यशवंत दांगट यांच्यावर गुन्हा दाखल करून आम्हांला न्याय मिळवून देण्याची मागणी हे शेतकरी करत आहे !