मोर्शी येथील प्लास्टिक निर्मूलन रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले ! -३०० विद्यार्थ्यांनी रॅली काढून केली जनजागृती !

0
597
Google search engine
Google search engine

पाथनाट्यातुन जनजागृती , विक्रेत्यांना दिल्या कागदी पिशव्या !

५०० कापडी व कागदी पिशव्या तयार करून दिला प्लास्टिक मुक्तीचा संदेश !

रुपेश वाळके / दापोरी -प्रतिनिधी /

पर्यावरणाला सर्वाधिक धोकादायक ठरणाऱ्या प्लास्टिक निर्मूलनसाठी

मोर्शी येथील भारतीय महाविद्यालयाचे रासेयो पथक , रेनबो ग्रुप , वन परिक्षेत्र कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्शी शहरातून काढलेल्या प्लास्टिक निर्मूलन रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती करीत शहरातील विक्रेत्यांना कागदी पिशव्या वितरित केल्या. मोर्शी येथे १ ऑगस्ट रोजी प्लास्टिक निर्मूलन रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर रॅली भारतीय महाविद्यालयातून बस स्थानक, जयस्तंभ चौक, रामजी बाबा, गुजरी बाजार, गांधी चौक, मार्केट परिसर येथे रॅलीचे आयोजन केले व वनपरिक्षेत्र कार्यालय येथे राष्ट्रगीताने विसर्जन करण्यात आले. रॅली मध्ये विद्यार्थ्यांना पथनाट्य व स्लोगनच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त भारत करण्याविषयी जागृती निर्माण केली तसेच रा. से.यो. विद्यार्थ्यांनी स्वतःहा 500 कापडी पिशव्या तयार करून रॅली दरम्यान लोकांमध्ये जागृती व्हावी म्हणून पिशव्या वाटप करण्यात आल्या. रॅलीत विद्यार्थ्यांच्या हातात असलेले प्लास्टिक निर्मूलनाचे फलक सर्वांचे लक्ष वेधत होते. रेनबो ग्रुप तर्फे रॅली दरम्यान प्रत्येक चौकात ‘मानवाचा मानवाद्वारे आत्मघात’ या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. यातून प्लास्टिक निर्मूलनाविषयी संदेश देण्यात आला. सदर रॅली मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी दगडे साहेब , वन विभागाचे कर्मचारी , भारतीय महाविद्यालयातील प्रा. विनायक खांडेकर, रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. संदीप राऊत, प्रा. दिपक काळे, प्रा. मनोज वाहाने, प्रा. मनीष गुडधे, रुपेश मेश्राम , मोहन मडघे, शेखर भाऊ चौधरी, रुपेश वाळके, शरद कणेर, अजित जोशी , श्रीकांत देशमुख , रेनबो ग्रुपचे भाग्यश्री चौधरी , अनुजा राऊत , मयुरी जुनघरे , वैष्णवी आजनकर , चेतन चव्हाण , अक्षय डहाने , विपुल दारोकर , ऋषिकेश धरमकर , शुभम फाटे , त्रिशूल गेडाम , अक्षय ठोंबरे , कृनाल चौधरी , गौरव उपासे , आकाश चौधरी , चेतन पाटील , यश चौधरी , सर्व पदाधिकारी उपस्थित होते.