चोरांच्या भितीने जागत आहे गावे शहरातही दहशत, अफव्यांना उधाण

0
600

चांदुर रेल्वे :- (शहेजाद  खान)-

 

तालुक्यातील मांजरखेड कसबा, बासलापुर, चिरोडीसह पोहरा या गावात रात्रीचे चोर शिरत असून त्यांनी अनेकांच्या घरात धुमाकूळ घातला असल्याच्या चर्चा गेल्या दोन तिन दिवसापासून संपुर्ण तालुक्यात सुरु असून त्यांना पकडण्यासाठी हे चार ही गांव रात्रीला जागत आहे. तर गुरूवारी रात्रि हेच चोर शहरात शिरले असल्याचे ही चर्चा दिसून आली.
कुठल्यातरी दंग्यातील अनेक आरोपी फरार असून त्यांनी तालुक्यातील जंगलात आश्रय घेताला आहे व तेच लोक रात्रीला या परिसरातील घरात शिरुण हैदोस माजवित असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहे. हे चोर घरात शिरल्यानंतर पहिले खायचे पदार्थ शोधतात व नंतर मिळेल ते सामान चोरी करतात असे या परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. मांजरखेड मधील ग्रामस्त या चोरांमुळे सर्वात जास्त काळजीत पडले असून सर्वात जास्त चोऱ्या याच गावात झाल्याचे समजते. गावातील लोकांनी तिन संशयितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते, परंतु पोलिसांनी नंतर त्यांना सोडून दिल्याने ग्रामस्त संतापले आहे. त्याचा रोष  ते गावातील पोलिस पाटलाला देत असून पोलिस पाटिल याकड़े दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही गावातील लोक करीत आहे. त्याच्या रितसर तक्रारी गावकऱ्यांनी पोलिस स्टेशनला दिली असल्याची माहिती आहे.
गुरूवारी रात्रि शहरातील खड़कपूरा, डांगरीपूरा, महादेव घाट परिसर, भगवान चौक या परिसरातील लोकही हातात काड्या घेऊन रात्रभर घराबाहेर उभे होते. या भागातही चोर शिरल्याचे लोकांनी सांगितले.
याबाबत स्थानिक पोलिस स्टेशनशी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की लोकांच्या चर्चा ऐकू येत आहे, लेखी तक्रार मात्र कुणाचीही नसल्याचे समजते, परंतु अफ़व्याचे लोन मात्र झपाट्याने पसरत आहे.