2 संशयीत चोर -नागरिकांनी दिले पोलीसांच्या ताब्यात -संशयीत चोरांना पाहण्यासाठी शहरवासीयांची एकच गर्दी

0
714
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 

 


अनेक दिवसापासुन चांदुर रेल्वे शहरासह तालुक्यात काही भुरट्या चोरांनी धुमाकुळ घातल्याच्या चर्चा सुरू असतांना एका शहरवासीयाने दोन संशयीत चोर पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
तालुक्यातील मांजरखेड कसबा, बासलापुर, चिरोडीसह पोहरा या गावात रात्रीचे चोर शिरत असून त्यांनी अनेकांच्या घरात हैदोस घातला असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून संपुर्ण तालुक्यात सुरु असून त्यांना पकडण्यासाठी  ही गांव रात्रीला जागत आहे. तर गुरूवारी रात्रि हेच चोर शहरात शिरले असल्याचे ही चर्चा दिसून आली. अशातच शनिवारी सायंकाळी शहरातील एका शहरवासीयाने अमरावती रोडवरील तेलई माता मंदिराजवळील आपल्या शेतातुन दोन संशयीत चोर पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले. या चोरांना पाहण्यासाठी शहरवासीयांनी रात्री 10.30 वाजतापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये एकच गर्दी केली होती. मात्र हे दोन संशयीत चोर खरंच चोर आहे की निर्दोष आहे याची सखोल चौकशी पोलीस करीत होते. पकडलेले चोर हे बाहेर गावातील सोयाबीन सोंगायला आलेले मजुर असल्याचीही चर्चा यावेळी दिसुन आली.