अवैध गोवंश वाहतुक करणारे 2 ट्रकसह 34 बैल मंगरुळ पोलीसांच्या ताब्यात

0
837
Google search engine
Google search engine


धामणगांव रेल्वे / श्री मंगेश भुजबळ /-

 गोहत्या बंदी अमलात आल्यानंतर राज्यात अवैध गौवंश वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे.धामणगांव तालुक्यातील भातकुली रेणुकापुर येथे सकाळी 6 वाजताच्या सुमारास अवैध गौवंश वाहतुककरणारे ट्रक  मंगरुळ दस्तगिर पोलीसांच्या हाती लागले आहे.
            सकाळी 6 वाजताच्या सुमारास अवैध गौवंशवाहतुक करणारे दोन ट्रक क्र MH17 BD – 6678  चा चालक शेख जलीम शेख कय्युम रा.पिंपळगाव (बहीणाई)ता.ना.दगाव खंडेश्वर जि.अमरावती व क्लीनर 1)पवन पितांबर अमृतकर वय 30,धनपाल विठ्ठल जांभुळे वय 35 दोन्ही वार्ड नं.4 नागभिड जि.चंद्रपुर, व  MH04- CP 8193 चा चालक अब्दुल जाबीर अब्दुल मजीद वय 43,वार्ड नं.3,छोट्या मंजीद जवळ नांदगाव खंडेश्वर,व क्लीनर 1)सचिन हरीदास गुरपुडे वय 25 रा.विलम ता.नागभिड जि.चंद्रपुर, 2)माणिक शालीकराम खोब्रागढे वय 35 रा. नांदगाव ता.सिंदेवाहि जि.चद्रपुर या ट्रक समावेत 6 आरेापींना अटककरण्यात आली असुन यांनी त्यांचे ट्रकमधील बैल हे निर्दयीपणे व कृरतेने त्याना हवा व पाणी मिळणार नाही या पद्धतीने कोंबुन दोन्ही ट्रक मधील 34बैलांची कींमत अंदाजे 408000रु व दोन्ही ट्रकची कींमत 1600000रु अशा एकूण 2008000रु चा माल कत्तलीकरीता कोंबुन वाहातुक करीत असताना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यातील चालक व क्लीनर यांचे विरुध्द माहा.प्राणी संरक्षण अधि1976च्या कलम 5 अ,ब,9 व पशु अत्याचार प्रतिबंधक  अधिनियमाचे कलम 11(क)(ड)(इ)(ज)सहकलम 119 मुपोका व 66/192/184,83/177मोवाका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगरुळ दस्तगिर पोलीस स्टेशनचेसहायक पोलीस निरीक्षक अमित वानखडे व त्याच्यासहकारी या प्रकरणी पुढील तपास करित आहे.पकडण्यात आलेले 34 लहान मोठया बैलांना धामणगांव गौरक्षण संस्थाला सुपूर्त करण्यातआले आहे. या प्रकरणी भातकुली रेणुकापुर येथिल भारतीय जनता युवा मोर्चाचा  काही तरुणांनी मोलाचे सहकार्य केले असे कळते.
            गोवंश हत्या बंदी नंतर छुप्या मार्गाने ग्रामिणभागातील जनावरांना कत्तलीसाठी मोठया शहरांपर्यंतपाहचुन त्यांची विलेवाट लावली जाते. या गौरख धंदयालाबंदीच्या कायद्यानंतरही कायद्यानंतरही पुर्णविराममिळाला नसल्याचे चित्र राज्यभऱात पहावयास मिळतआहे. यावरुन या  अवैध गोरख धंदयात किती आर्थिकउलाधाल असेल याची आकलन करणे शक्य नाही.धामणगांव तालुक्यातुन सुध्दा अवैध मार्गाने चालणारा हागौवंशाचा प्रवास सुरु असल्याचे बोलल्या जात आहे.यावरुन स्थानिक पोलीस प्रशासन व गोवंश प्रेमी सुध्दासापडा रचुन या बिलंदरावर लक्ष ठेवुन बसले होते. आजसकाळी झालेल्या मंगरुळ पोलीसांची ही मोठी कारवाईम्हणावी लागेल यात शंका नाही.या कारवाईत पोलीससहायक निरीक्षक अमित वानखडे सह श्रीकृष्ण शिरसाट,राहुल वानखडे ,पवन हजारे,प्रमोद इंगळे तर वाहन चालक आसोले यांचा समावेश आहे.