*जानेवारीत होणार अण्णा हजारे यांच आंदोलन*

0
1201
Google search engine
Google search engine

नगर-

प्रतिनिधि – ऊमेर सय्यद-

रालेगन सिद्धी येथे गेल्या दोन दिवसापासून अण्णा हजारे यांच्या नेत्रुत्वाखाली देशातील कार्यकर्ते यांच्या सोबत लोकपाल आंदोलना विषयी बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकित दील्ही , हरियाणा , पंजाब , राजस्थान , उत्तरप्रदेश , यांसह अन्य राज्यातून कार्यकर्ते उपस्थित होते भाजपा सरकार ने निवडणुकीपूर्वी लोकपाल आणि लोकायुक्तची अंमलबजावणी करण्याचा आश्वासन दिले होते मात्र भारतीय जनता पक्षाला सत्तेत आल्यानंतर तीन वर्ष उलटून देखील लोकपाल आणि लोकायुक्ताचि अंमलबजावणी होत नाही तसेच या संदर्भात देशाचे पंतप्रधान यांना वारंवार पत्र व्यवहार करून देखील पाठवलेल्या पत्राच उत्तर मिळत नसल्याने अण्णा हजारे यांनी अखेर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे ! दरम्यान दील्ही येथे होणाऱ्या आंदोलनाचि दिशा आणि आंदोलनाचा महीना ठरविन्यासाठी 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी देशातील सर्व कार्यकर्त्यांसह अण्णा हजारे यांच्या नेत्रुत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती ! दरम्यान या बैठकीत जानेवारी 2018 च्या शेवटच्या आठवड्यात दील्ही येथे लोकपाल , लोकायूक्त आणि शेतकरी यांच्या मागण्या संदर्भात आंदोलन होणार असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे