सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळेच राज्य अंधारात- लोडशेडिंगच्या प्रश्नावर ना.धनंजयजी मुंडे आक्रमक

0
693
Google search engine
Google search engine

परळी:-

राज्य सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे एैन सदासुदीच्या आणि ऑक्टोबर हिटच्या दिवसात राज्य अंधारात सापडले असल्याचा आरोप करून कुठे गेला लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी लोडशेडिंगच्या प्रश्नावर आक्रमक प्रतिक्रिया देताना उपस्थित केला आहे.

यापुर्वी ग्रामीण भाग नेहमीच अंधारात असायचा आता मुंबई, पुणे, ठाणे अशी महानगरे हि अंधारात सापडली आहेत. लोडशेडिंगमुळे राज्यातील जनता अतिशय त्रस्त असुन जनतेचा या प्रश्नावर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही या प्रश्नावर तिव्र आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी उर्जा मंत्री असतांना राज्यात भारनियमन मुक्ती करून दाखवली होती. त्यांच्या पुण्याईमुळेच राज्य तिन वर्ष भारनियमन मुक्त होते मात्र दादांचा हा भारनियमन मुक्तीचा वारसा या सरकारला चालवता ही आला नाही आणि टिकवता ही आला नाही. असा टोला लगावताना केंद्राकडुन राज्याला पुरेसा कोळसा मिळवण्या ऐवढे राज्य सरकारचे वजनही नाही आणि तेवढी धमकही नाही. त्यामुळेच राज्य अंधारात आले असुन, सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल असे श्री.मुंडे म्हणाले.