नितीन गडकरी यांचे जीवन स्नेहसावली देणाऱ्या वटवृक्षाप्रमाणे बहरलेले -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
622
Google search engine
Google search engine

• पसायदान या नितीन गडकरी यांच्यावरील विशेष अंकाचे प्रकाशन


      नागपूर :-
आपल्या माणसांच्या विकासासाठी नेहमी दक्ष असणाऱ्या, त्यांना सदैव आपल्या स्नेहसावलीत ठेवणाऱ्या नितीनजी गडकरी यांचे जीवन वटवृक्षाप्रमाणे बहरलेले असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
लक्ष्मीनगर चौकातील हॉटेल अशोका  येथे  दैनिक तरुण भारत तर्फे  केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ठयब्दिपूर्ति निमित्त  सामाजिक व राजकीय  कर्तबगारीला वाहिलेल्या ‘पसायदान’ या गौरव अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी आयोजित समारंभास मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी  महापौर नंदाताई जिचकार होत्या तर व्यासपिठावर नरकेसरी प्रकाशनचे कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट,  मुख्य संपादक गजानन निमदेव, संपादक शाम पेठकर, सीईओ सुनिल कुहिकर व्यासपिठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एखादया स्नेहसावली देणाऱ्या वटवृक्षाप्रमाणे नितीनजी गडकरी यांचे जीवन आहे. नितीनजींचे सर्वच क्षेत्रात जिव्हाळयाचे संबंध आणि संपर्क आहेत.त्यांच्या बद्दल सर्व क्षेत्रात आदरभाव आहे. नितीनजी स्वप्न पाहतात व ती पूर्ण करण्यासाठी झपाटलेपणाने काम करतात. दुर्दम्य इच्छाशक्ति आणि आत्मविश्वासाने नितीनजी ही स्वप्ने वास्तवातही आणतात. नितीनजींना तंत्रज्ञानाबद्दल मोठे आकर्षण असून या संकल्पना समजून घेऊन त्याचा ते विस्तार करतात. नितीनजींच्या जीवनावर आधारित तरुण भारत दैनिकाने प्रकाशित केलेला विशेषांक हा रंजक तसेच प्रबोधनात्मक असा वैशिष्ठयपुर्ण  असल्याचे गौरवोद्गारही श्री. फडणवीस यांनी यावेळी काढले.
तरुण भारत हे केवळ दैनिक नसून चळवळ आहे. वृत्तपत्र क्षेत्रात काळाच्या ओघात अनेक बदल झाले. मात्र तरुण भारतने आपले वेगळेपण कायमच जपले.  तत्वनिष्ठ व प्रबोधानात्मक लिखाण यांची मागणी करणारे वाचक हीच तरुण भारतची मोठी ठेव आहे. श्री. नितीन गडकरी यांच्या सामाजिक तसेच राजकीय कार्यांचा वेध घेणाऱ्या विशेषांकामुळे विविध क्षेत्रातील नामवंताने नितीनजी कसे पाहिले याचा अनुभव वाचायला मिळणार आहे. या अंकाला मोगऱ्याच्या फुलाची उपमा समर्पक आहे आणि याच फुलांच्या परडीत अभिनव पद्धतीने अंकाचे प्रकाशन होत असल्याचा उल्लेख  श्री. फडणवीस यांनी यावेळी केला.
प्रारंभी तरुण भारतचे कार्यकारी संचालक धनंजय बापट यांनी स्वागत करुन तरुण भारत या दैनिकाच्या वाटचालीचा आढावा प्रास्ताविकातून सांगितला.
गौरव अंकाचे संपादक श्याम पेठकर म्हणाले, नितीनजी गडकरी यांचे व्यक्तित्व व्यक्तिमत्वाच्या पलिकडे जाऊन समष्टीच झाले आहे. सुत्रसंचालन सुनिल कुहिकर यांनी केले. तर आभार गजानन निमदेव यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.